मुंब्रा बायपासवर डोंगरावरून पडला भला मोठा दगड

    10-Jul-2024
Total Views |

Mumbra
 
ठाणे : मुंब्रा बायपासवर अपघात दरडी कोसळणे आदी प्रकार नेहमीच घडत असतात. अनेकदा भुस्खलन होऊन रस्त्यावर अडथळे निर्माण होतात. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा बायपास रोड लगत पाणी जाण्यासाठी चर खोदण्याचे काम करीत असताना डोंगरावरून भला मोठा दगड रस्त्यावर पडला.
 
सुदैवाने, या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नाही, तसेच दुर्घटनेवेळेस वाहनांची रेलचेल नव्हती. घटनास्थळी मनपा आपत्कालीन पथक व घनकचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बायपास रोडवर पडलेला दगड जेसीबी मशीनच्या साह्याने रस्त्याच्या बाजूला करून, मुंब्रा बायपास वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.