बहिणीच्या विनयभंगाला विरोध करण्यासाठी गेलेल्या भावाची हत्या; आरोपी अश्फाक, इक्बाल, सलामतला अटक

    09-Jun-2024
Total Views |
 UP PRATAPGADH
 
लखनौ : उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विकास असे मृत तरुणाचे नाव आहे. अश्फाक, इक्बाल, सलामत, रुस्तम आणि नूरजहाँ अशी पाच आरोपींची नावे आहेत. गुरुवार, दि. ६ जून २०२४ रात्री गावाजवळील एका पुलाखाली त्याचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या डोक्याला गोळी लागल्याचे निशाण होते. रिपोर्ट्सनुसार, दि. ५ जून रोजी अशफाक, इक्बाल आणि सलामत यांनी विकासच्या बहिणीचा विनयभंग केला होता.
 
पोलिसांनी अशफाक, इक्बाल, सलामत आणि नूरजहान यांना अटक केली असून रुस्तमला पकडण्यासाठी छापे टाकत आहेत. प्रतापगड जिल्ह्यातील अंतू पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. कमलेश कुमार यांनी ६ जून (गुरुवार) रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, दि. ५ जून रोजी त्यांची मुलगी शौचासाठी बाहेर गेली होती. यावेळी अश्फाक, इक्बाल, सलामत यांनी मुलीला अडवून तिचा विनयभंग सुरू केला.
  
मुलीने विरोध केला असता तिन्ही आरोपींनी तिला जातीवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात तिचा भाऊ विकास आला. जेव्हा विकासने आपल्या बहिणीच्या विनयभंगाचा निषेध केला तेव्हा अश्फाक, इक्बाल आणि सलामत यांनी त्यालाही जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा विकास त्याच दिवशी बेपत्ता झाला होता. बराच शोध घेऊनही कुटुंबीयांना तो सापडला नाही.
  
दुसऱ्या दिवशी बायपासजवळील पुलाखाली गावकऱ्यांना मृतदेह आढळून आल्याने त्यांनी कमलेशला याची माहिती दिली. कमलेश घटनास्थळी पोहोचला तेव्हा त्याला विकासचा मृतदेह आढळून आला. विकासच्या डोक्यात गोळी लागली होती. अशफाक, इक्बाल, सलामत आणि रुस्तम यांनी आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप कमलेशने केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
 
पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम 302, 201, 34, 354 (अ), आणि 506 अंतर्गत, एससी/एसटी कायद्याच्या विविध कलमांसह गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर छापा टाकून अश्फाक, इक्बाल आणि सलामत यांना अटक केली. तपासादरम्यान २२ वर्षीय नूरजहाँचे नावही समोर आले; ती मुख्य आरोपी अशफाकची बहीण आहे.