राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा, मंत्रिमंडळात कुणाची लागणार वर्णी!

    08-Jun-2024
Total Views |
nda government cabinet
 

नवी दिल्ली :       एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा येत्या ०९ जूनला रोजी सायंकाळी ०७:१५ वाजता होणार असून शेजारील देशातील प्रमुख नेते यांच्यासह ७ हजार जणांची उपस्थिती असणार आहे. दरम्यान, राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडून पंतप्रधानपदाची शपथ देण्यात येणार आहे.

दरम्यान, राष्ट्रपती भवन येथे होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरिशस आणि इतर देशांचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मोदी तिसऱ्यांदा शपथ घेण्यापूर्वी मंत्रिमंडळात मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पंतप्रधानांसोबतच कॅबिनेट मंत्र्यांचाही शपथविधी होणार आहे. एनडीएच्या मित्रपक्षांनीही मोदी ३.० कॅबिनेटमध्ये मंत्रीपदांची मागणी केली आहे.




मंत्रिमंडळात समाविष्ट होणाऱ्या नेत्यांची संभाव्य यादी समोर आली आहे. या यादीनुसार अनेक माजी मंत्र्यांनाही नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एनडीए आघाडीतील घटक पक्ष असलेल्या टीडीपी, जदयू, आरएलडी, एलजेपी(रामविलास), एनसीपी, AJSU, अपना दल सोनेलाल, आणि शिवसेना या पक्षांच्या नेत्यांचाही समावेश आहे.

भाजपला लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळालेले नसून एनडीएच्या घटक पक्षांसोबत सरकार स्थापन करत आहे. एनडीएच्या घटक पक्षांनी मंत्रिमंडळात सामील होण्याचे मान्य केले आहे, परंतु मित्रपक्षांनीही मंत्रिपदाची मागणी केली असून या संदर्भात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत मित्रपक्षांची बैठकही झाली आहे.