नरेंद्र मोदींचा ऐतिहासिक शपथविधी; 'या' देशाचे प्रमुख उपस्थित राहणार!

    08-Jun-2024
Total Views |
narendra modi oath


नवी दिल्ली :       लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असून नरेंद्र मोदी लवकरच पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला तब्बल ७ हजार जणांना निमंत्रण देण्यात आले आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरिशस आणि सेशेल्सचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
 दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी ७ हजार लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. रविवार, ०९ जूनला सायंकाळी ०७:१५ वाजता शपथविधी सोहळा होणार असून पंतप्रधानांच्या शपथविधीच्या निमंत्रणाचे चित्र समोर आले आहे. एनडीएकडून मोदी यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली असून राष्ट्रपतींसमोर सरकार स्थापनेचा दावादेखील त्यांनी केला आहे. एकंदरीत, राष्ट्रपती भवनाची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनात शपथविधीचा सोहळा पार पडणार असून एनडीए तिसऱ्यांदा सत्तेत विराजमान होणार आहे. मोदींच्या शपथविधी सोहळ्याला अनेक देशांचे प्रमुख उपस्थित राहणार असून यापार्श्वभूमीवर दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे शपथविधीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला नो फ्लाइंग झोन घोषित करण्यात आले आहे. याद्वारे दिल्लीतील प्रत्येक कोपऱ्यावर पोलिसांची पाळत राहणार आहे.