मुंबई मेट्रो वनची दशकपूर्ती !

16 गाड्यांनी 12.6 कोटी किमीचा प्रवास पूर्ण केला

    08-Jun-2024
Total Views |

metro one

मुंबई, दि. ८: प्रतिनिधी 
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर दरम्यान धावणाऱ्या 'मुंबई मेट्रो वन' या शहरातील पहिल्या मेट्रोला ९ जून रोजी नऊ वर्षे पूर्ण होणार आहेत. ११.४० किमी लांबीची ही मेट्रो सेवा २०१४मध्ये मुंबईकरांसाठी खुली करण्यात आली होती, जिने आज ९७ कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली आहे.
गर्दीच्या वेळी उपनगरीय रेल्वे लोकल गाड्यांमध्ये प्रवास करण्याची सवय असलेल्या मुंबईकरांना वातानुकूलित प्रवासाची सोय देणारी ही मुंबईतील पहिलीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. आज मुंबई आणि उपनगरात मेट्रोचे जाळे उभारले जात आहे. मात्र, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि एमएमआरडीएने भागीदारीत मुंबईच्या पहिल्या मेट्रो लाईनचा शुभारंभ झाला. आज आठ जून २०२४ रोजी, मुंबई मेट्रो वनने उत्तम सेवांसह ९७ कोटीं प्रवाशांना घेऊन १० वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केली, असल्याची माहिती दिली आहे.
16 गाड्यांनी 12.6 कोटी किमीचा प्रवास पूर्ण केला

या १० वर्षाच्या कालावधीत मुंबई मेट्रो वनने ९९% पेक्षा जास्त वक्तशीरपणासह ११ लाख ट्रिप केल्या आहेत. पावसाळ्यात देखील मुंबई मेट्रो वन नेहमीच मुंबईकरांसाठी तारणहार ठरली आहे. या १० वर्षांच्या ऑपरेशन्समध्ये, मुंबई मेट्रो वनच्या १६ ट्रेनने जवळपास १२.६ कोटी किमी प्रवास केला जो प्रति ट्रेनने सुमारे ७.९ लाख किमी अंतर पार केले आहे.

मुंबईकरांची मेट्रो वाहतुकीस पसंती

एमएमओपीएलच्या प्रवक्त्याने सांगितले की, या आठ वर्षांत आम्ही अनेक यश संपादन केले आहे. ते म्हणाले की, आम्ही मुंबई मेट्रोमध्ये भारतातील पहिली मोबाइल क्यूआर तिकीट प्रणाली बसवली. आम्ही सर्व १२ मेट्रो स्टेशन आणि महानगरांमध्ये ३ मेगावॅट क्षमतेचे रूफटॉप सोलर पॅनेल बसवले. याशिवाय, आम्ही कागदावर आधारित क्यूआर तिकीट आणि व्हॉट्सॲप आधारित तिकीट प्रणालीसह अनेक महत्त्वाच्या यश मिळवल्या आहेत.

मुंबईकरांचे आभार

सध्या, मुंबई मेट्रो वन दरदिवशी सुमारे ४.५ लाख प्रवाशांची वाहतूक करते आणि दररोज ४१८ ट्रिप चालवते. ज्याची सेवा पीक अवर्समध्ये अंदाजे ३.५ मिनिटे आणि ऑफ-पीक अवर्समध्ये ७ मिनिटे असते. “आमच्या मागील १० वर्षांच्या प्रवासात ९७ कोटी प्रवाशांना अनुभव प्रदान करताना आनंद होत आहे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर कॉरिडॉरला जीवनवाहिनी बनण्यास मुंबईकरांनी आम्हाला दिलेल्या जबरदस्त स्नेहाचे आम्ही कौतुक करतो. आम्ही मुंबईतील लोकांचे आभारी आहोत. ऑपरेशनल कार्यक्षमता, तांत्रिक नवकल्पना आणि ग्राहक केंद्रिततेवर जबरदस्त लक्ष केंद्रित करून, मुंबई मेट्रो वनने शहराच्या प्रवासाच्या पद्धतीत बदल घडवून आणला आहे. ही विलक्षण कामगिरी जागतिक दर्जाच्या सेवा, ग्राहक-केंद्रित अनुभव आणि निर्दोष ऑपरेशनल उत्कृष्टतेचा परिणाम आहे.”

वर्ष प्रवासी संख्या

2014-15  - 2.75 लाख
2015-16  - 2.85 लाख
2016-17  - 3.35 लाख
2017-18  - 3.80 लाख
2018-19  - 4.30 लाख
2019-20  - 4.50 लाख
2020-21  - 0.72 लाख
2021-22  - 1.35 लाख
2022-23  - 3.50 लाख
2023-24  -  4.50 लाख