रामोजी फिल्मसिटी या स्वप्नमय दुनियेचा कर्ताधर्ता काळाच्या पडद्याआड, रामोजी राव यांचं निधन

    08-Jun-2024
Total Views |
 
ramoji rao
 
 
हैदराबाद : हैदराबादमधील रामोजी फिल्मसिटी आणि ईनाडू वृत्तपत्राचे संस्थापक पद्मविभूषण रामोजी राव यांचं आज ८ जून २०२४ रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर हैदराबादमधील स्टार रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारीच होते आणि अखेर आज पहाटे ३.४५ ला त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ८७ व्या वर्षी रामोजी राव यांचं निधन झाले असून त्यांचे पार्थिव हे रामोजी फिल्म सिटी येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे.
 
 
 
रामोजी राव यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९३६ला आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पेडापरुपुडी गावातल्या एका शेतकरी कुटुंबात झाला होता. जगातील सिनेरसिकांना आश्चर्याचा धक्का देणारी रामोजी फिल्म सिटी हे थीम पार्क आणि फिल्म स्टुडिओची स्थापना त्यांनी केली होती. याशिवाय ईनाडू न्यूजपेपर, ईटीव्ही नेटवर्क, रमादेवी पब्लिक स्कूल, प्रिया फूड्स, कालांजली, उषाकिरण मूव्हीज, मयुरी फिल्म डिस्ट्रिब्युटर्स आणि डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स या रामोजी राव यांच्या मालकीच्या कंपन्या आहेत. रामोजी राव यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.