रोटी, तंदूरनंतर आता फेस मसाज थुंकी लावून; अमजदचा व्हिडिओ व्हायरल!

    08-Jun-2024
Total Views |
Shamli Salon Viral video


नवी दिल्ली :
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका स्लूनमधील एक कामगार ग्राहकाच्या चेहऱ्यावर मालिश करत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील थानाभवन पोलीस स्टेशन परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी अमजदचा शोध सुरु केला. त्याचबरोबर सोशल मीडिया यूजर्सही याबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. 


व्हायरल व्हिडिओमध्ये एका स्लुनमधील कामगार तरुणाच्या चेहऱ्यावर मसाज करत असल्याचे दिसत आहे. मसाज करताना तो तरुणाच्या चेहऱ्यावर थुंकीही लावतो. व्हि़डिओ व्हायरल झाल्यावर शामली एसपी अभिषेक यांनी ठाणे भवन पोलिस स्टेशनचे प्रभारी सतीश कुमार यांना चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, व्हिडिओच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा व्हिडिओ व्हायपल करणाऱ्या व्यक्तिचे नाव अमजद असे असून तो स्लूनमध्ये न्हाव्याचे काम करतो. व्हिडिओची तपासणी केली असता हा व्यक्ती गावातील बसस्थानकावर सलून चालवतो असे आढळून आले. अमजद हा भानेड गावचा रहिवासी असून त्याच्या वडिलांचे नाव इरफान असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.