शनिवार विशेष: परदेशी गुंतवणूकदारांचे शेअर बाजारात शॉर्ट सेलिंग षडयंत्र फसले पुढे काय?

    08-Jun-2024
Total Views |

FPIU
 
मोहित सोमण
 
निवडणुकीच्या निकालानंतर बाजार घटले आहे असे अजिबात नाही. तसा निकालाचा दिवस अपवाद वगळता सलग तीन दिवस बाजारात वाढ झाली आहे. मुख्यतः ही वाढ झालेली यासाठी महत्वाची आहे कारण गेल्या महिनाभरात वीआयएक्सने शेअर बाजारात धुमाकूळ घातला होता. छोट्या, मोठ्या सगळ्याच समभागात मोठी हालचाल झाली. अनेक शेअर्स १५ दिवसांच्या आत अप्पर सर्किटवर व लोअर सर्किटवर पोहोचले आहेत
 
मुख्यतः बाजारातील निफ्टी, सेन्सेक्स निर्देशांकात ही मोठी वाढ साशकंतेची अधिक होती. कुठले सरकार येईल या अपेक्षेने बहुतांश गुंतवणूकदारांना बाजारात मोदी सरकारच येईल ही शाश्वती होती. परंतु त्यांना बहुमत मिळेल का अथवा नाही मिळेल या साशंकतेने बाजार अस्थिर राहिले त्यामुळे निकालांच्या आदल्या दिवशीपर्यंत बाजारात चढउतार झाली होती. दिवसांच्या अखेरीस वीआयएक्स १३ ते १४ टक्क्यांपर्यंत बंद झाल्याने बाजारात अनेकदा वाढ झाली नाही.
 
दुसरीकडे परदेशी गुंतवणूकदारांनी शॉर्ट सेलिंगची खेळी अवलंबली असल्याने निकालपूर्वी बाजारात घसरण झाली परिणामी इंडेक्स घसरला. त्यावेळी बाजारात 'अंडरकरंट' कायम होती. निर्देशांक खालीवर झाला तरी बाजारातील डायनॅमिक्स स्थिर असल्याने त्याचा परिणाम निकालानंतर पहायला मिळत होते. किंबहुना एनडीए सत्तेत आल्यानंतर देखील नरेंद्र मोदी सरकारला बहुमत नाही अशी चिंता गुंतवणूकदारांनी व्यक्त केली होती. मात्र बाजारातील गेल्या तीन दिवसांच्या वाढीमुळे ही शंका दूर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
निश्चितच गठबंधन सरकार आले नाही तरी नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, चिराग पासवान यांच्या पक्षांनी कुठल्याही अटीतटीवर पाठिंबा दिलेला नाही. म्हणून मोदींना सरकार स्थापन करणे शक्य झाले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. पुन्हा एकदा मजबूतीचे सरकार येऊन भारतात आर्थिक सुधारणा पुन्हा सुरूच राहील असा विश्वास जडल्याचे पहायला मिळत आहे. मुख्यतः चांगली मंत्रीपद, पोर्टफोलिओ मित्रपक्षांना द्यावा लागला तरी मध्यातून ते सरकार सोडून जातील अशी शक्यता नाही. जवळपास ३०३ खासदारांचे संख्याबळ झाल्याने बाजारात आर्थिक धोरणे स्थिर होऊ शकतात.
 
विशेषतः पीएसयु, पायाभूत सुविधा, संरक्षण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सेवा, कृषी, औद्योगिकीकरण याला वेग मिळू शकतो. विशेषतः यामध्ये रेल्वे समभागांचा विशेष उल्लेख करावा लागेल गेल्या महिन्यात व गेल्या तीन दिवसात रेल्वे समभागात मोठी वाढ झाली आहे. यातून हे स्पष्ट होते की बाजारातील जनभावना विकासाचे प्रतिनिधित्व करत आहेत. या क्षेत्रातील वाढीमुळे त्याचा परिणाम शेअर बाजारात जाणवत आहे. परकीय देशातील गुंतवणूकदारांना मोदी सरकार पुन्हा तेच नाही या अपेक्षेने मोठी गुंतवणूक बाजारातून काढून घेतली. बाजारात त्याचा त्यापूर्वी फरक देखील पडला. मात्र निकालानंतर बाजार पडण्याऐवजी वाढतच आहे. या भावनेनं पुन्हा एकदा परदेशी गुंतवणूकदार भारताकडे मोर्चा वळवत भारतात गुंतवणूकीसाठी इच्छूक झाले आहेत.
 
आगामी काळात सेन्सेक्स व निफ्टी वधारला जात असताना त्याला पीएसयु कंपन्यांचा चांगला पाठिंबा मिळू शकतो. दुसरीकडे इतर क्षेत्रातही कामगिरी सुधारली जाऊ शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार येणार हे निक्षून सांगितले होते. प्रत्यक्षात आता अर्थमंत्री कोण होणार हे स्पष्ट झाले नसले तरी विकसित भारतासाठी लागणारे फ्रेमवर्क तसेच राहिल अशी जनमानसाची इच्छा आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात देशांतर्गत गुंतवणूकीत वाढ होत आहे.
 
अहवालातील माहितीप्रमाणे, भारतातील म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीची गेल्या वर्षीपेक्षा १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड माहितीनुसार, ही वाढ झाली आहे. वाढत्या एसआयपी गुंतवणूकीतून बाजारावर लोकांचा आत्मविश्वास वाढत आहे. बाजारातील वातावरण गुंतवणूकदारांना फायदेशीर ठरेल असा कयास मांडला जात आहे . वाढत्या विश्वासाने बाजारात गुंतवणूकदार वाढत आहेत. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये एसआयपी २० दशलक्षावर वाढले आहे.
 
आता अर्थात बाजारातील गुंतवणूक ही जोखमेशी आधारित असल्याने यात गुंतागुंत मोठ्या प्रमाणात आहे. परंतु दुर्दैवाने इक्विटी गुंतवणूकीत आजही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी मोठी पातळी शिल्लक आहे ज्यामुळे बाजारातील निर्देशांकात चढउतार ह़ोत असते. अशावेळी वेट अँड वॉच या परिस्थितीत भारतातील गुंतवणूक कसा प्रतिसाद देऊन बाजाराची प्रतिष्ठा वाढवेल असे पुढील काळात बाजारात दिसूनअधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
 
त्याचीच शाश्वती निवडणूक निकालानंतर येत असताना बाजारातील गुंतवणूकदारांची जबाबदारी देखील वाढली आहे. एसआयपी व इक्विटी, म्युच्युअल फंड गुंतवणूकीमुळे बाजारात मोठे बाजार भांडवल उपलब्ध झाल्यास अंतिमतः तो फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होणार आहे. आता प्रश्न राहिला बाजारातील चढउताराचा तर तो त्या त्या काळात त्या परिस्थितीशी समभागाशी जुळवून घेऊ शकतो. मात्र त्याचा फायदा अथवा नुकसान गुंतवणूकदारांनाच होऊ शकतो. अशावेळी गुंतवणूकीठी आर्थिक सल्ला घेणे महत्वाचे ठरते. अनेक म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना त्यांचे ज्ञान कार्यशाळेतून मिळू शकते.
 
येणाऱ्या काळात बाजार घसरेल किंवा वाढेल. परंतु परदेशी लॉबी भारतात सरकार बदली व्हावे अथवा मोदी सरकार पडावे यासाठी शॉर्ट सेलिंगचा प्रयत्न निकालपूर्वी सातत्याने राहिल्याने बाजारात घसरण झाली होती. मात्र प्रत्यक्षात बाजारात वाढ झाली तरी निर्देशांकात मात्र खाली घसरले होते. आता ते पुन्हा वर आल्याने एफपीआय (FPI) गुंतवणूकदारांचा हिरमोड झाला आहे. आता बाजारातील त्यांच्या अपेक्षेप्रमाणे बाजार घसरण्याचे स्वप्न केवळ स्वप्नच राहून अपेक्षाभंग झाला आहे आणि पुन्हा तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होणार आहेत. भारतातील गुंतवणूकदारानी या खेळात जोरकसपणे खेळणे महत्वाचे आहे. त्यामुळे कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी सेबीच्या अटी नियमाचा अभ्यास करून पुढील पाऊल उचलणे हितकारक ठरेल. बाजारातील परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढली की नाही त्यांचा फरक न्यूटल करण्यासाठी आपली गुंतवणूक वाढवणे आवश्यक आहे. यासाठी आपला पोर्टफोलिओ यशस्वीपणे योजनाबद्ध तयार केल्यास त्याचा फायदा गुंतवणूकदारांना होईल.
 
आता शेअर बाजारातील वाढीमुळे हूरळून जाण्याचीही परिस्थिती नाही. बाजारात कधीही पडझड होऊ शकते अशा वेळेस आपली गुंतवणूक कुठल्या प्रकारची आहे हे ओळखून नवी रणनिती आखली गेली पाहिजे. ज्यामुळे कमीत कमी नुकसान होईल. दुसरीकडे भविष्यात महत्वाच्या समभागांना परिस्थिती अनुरूप लक्ष्य केल्यास बाजार कुठल्या दिशेने जात आहे याचा अंदाजही आपल्याला येऊ शकतो. भविष्यात काय होईल हे सांगणे कठीण असले तरी पुढील आंतरराष्ट्रीय जोखीम लक्षात घेतल्यास देशांतर्गत गुंतवणूकदारांनी काय करावे याचे तंत्र अवगत झाल्यास कमीत कमी नुकसान होऊ शकते.