नेरळ-अमन लॉज मिनीट्रेन बंद

अमन लॉज ते माथेरान फेऱ्या राहणार सुरु राहणार

    08-Jun-2024
Total Views |

matheran


मुंबई, दि. ८ : 
मध्य रेल्वेने नेरळ ते अमन लॉज मिनीट्रेन सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. पावसाळ्यात खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान अमन लॉज ते माथेरानदरम्यान मिनीट्रेनच्या शटल फेऱ्या सुरू राहणार आहेत. अमन लॉज ते माथेरानदरम्यान सोमवार ते शुक्रवारदरम्यान रोज ६ शटल फेऱ्या धावतात. शनिवारी-रविवारी प्रवाशांच्या संख्या अधिक असल्याने २ वाढीव फेऱ्यांसह एकूण आठ फेऱ्या चालवण्यात येतात. ३ द्वितीय श्रेणीचे डबे, एक प्रथम श्रेणी डबा आणि २ द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅन अशा एकूण सहा डब्यांची मिनी ट्रेन पावसाळ्यात धावती राहणार आहे. ८ जून ते १५ ऑक्टोबरदरम्यान नेरळ ते अमन लॉजदरम्यान मिनीट्रेन फेऱ्या बंद राहणार आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.


माथेरान-अमन लॉज शटल सेवा

(अ) माथेरान-अमन लॉज शटल सेवा (दैनंदिन)

माथेरान येथून सकाळी ८.२०, ९.१०, ११.३५, दुपार २ आणि ३, तर, संध्याकाळी ५.२०

(शनिवार/रविवारी)

७. विशेष-२ माथेरान येथून १०.०५ वाजता सुटेल अमन लॉज येथे १०.२३ वाजता पोहचेल

८. विशेष-४ माथेरान येथून दुपारी १.१० वाजता सुटेल अमन लॉज येथे दुपारी १.२८ वाजता पोहचेल
(ब) अमन लॉज-माथेरान शटल सेवा (दैनंदिन)

अमन लॉज येथून ०८.४५, ०९.३५, १२, दुपारी २.२५ २.४३ , ३.४० वाजता आणि संध्याकाळी ५.४५ वाजता सुटेल.

(शनिवार/रविवारी)

७. विशेष-१ अमन लॉज उपविभाग. १०.३० वाजता सुटेल माथेरान येथे १०.४८ वाजता पोहचेल

८. विशेष-३ अमन लॉज उपविभाग. १३.३५ वाजता सुटेल माथेरान येथे दुपारी १.५३ वाजता पोहचेल