मुइज्जू, प्रचंड, विक्रमसिंघे...पंतप्रधानांच्या शपथविधी समारंभात सामील होणार 'या' देशाचे राष्ट्रध्यक्ष!

    08-Jun-2024
Total Views |
Narendra Modi oath ceremony

नवी दिल्ली :
लोकसभा निवडणुक २०२४ च्या निकालानंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकार स्थापन करणार आहे. त्यासाठी दि. ९ जून रोजी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आणि इतर मंत्रीपरिषद नेत्यांचा शपथविधी होईल. दरम्यान भारताच्या शेजारी देशातील महत्त्वाचे नेते या शपथविधी समारंभात सहभागी होणार आहेत. त्यांना विशेष अतिशी म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या शपथविधीला श्रीलंकाचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफीफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ, नेपालचे पंतप्रधान पुष्प कमल दहल (प्रचंड), भुटानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे यांना सुद्ध निमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान या सर्व नेत्यांनी शपथविधी कार्यक्रमाचे निमंत्रण स्विकारले आहे. शपथविधी समारंभाव्यतिरिक्त संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू यांनी आयोजित केलेल्या भोजनाच्या कार्यक्रमात ही सर्व देशाविदेशातील नेते सहभागी होतील.
 
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल विस्टा प्रोजेक्टसाठी काम करणारे कामगार, सफाई कर्मचारी आणि तृतीयपंथी समुदायाच्या लोकांना ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी समारंभात विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. दि. ९ जून रोजी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या कार्यक्रमात विकसित भारतचे एम्बेसिटर म्हणून वंदे भारत आणि मेट्रोसाठी काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना आणि केंद्र सरकारच्या योजनेच्या लाभार्थींना आमंत्रित करण्यात आले आहे.