मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या ‘मुंज्या’ने बॉक्स ऑफिस गाजवले

    08-Jun-2024
Total Views |
 
Munjya
 
 
 
मुंबई : दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा हॉरर-कॉमेडी चित्रपट 'मुंज्या' सध्या प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. ७ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. ‘मुंज्या’च्या ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद पाहता पहिल्या दिवशी हा चित्रपट १-२ कोटी कमावेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता पण या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४ कोटींहून अधिक कमाई केली आहे.
 
sacnilk च्या रिपोर्टनुसार मुंज्याने पहिल्या दिवशी ४.२१ कोटींची कमाई केली आहे. सुरुवातच दणक्यात झाल्याने वीकेंडला आदित्य सरपोतदारचा 'मुंज्या' अधिक कमाई करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे.
 

Munjya 
 
'स्त्री' आणि 'भेडिया'सारख्या हॉरर-थ्रिलर चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या दिनेश विजान आणि अमर कौश‍िक यांनी 'मुंज्या'ची निर्मिती केली आहे. यात अभय वर्मा आणि शर्वरी वाघ यांची मुख्य भूमिका असून शर्वरीसह मोना सिंग, एस. सत्यराज, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम रसिका वेंगुर्लेकर, भाडिपा फेम भाग्यश्री लिमये हे कलाकारदेखील आहेत.