एक्सप्लेनर : वर्च्युअल क्रेडिट कार्ड म्हणजे काय त्याचे फायदे नुकसान जाणून घ्या

वर्च्युअल क्रेडिट कार्ड ही प्रत्यक्ष क्रेडिट कार्डाची डिजिटल आवृत्ती

    08-Jun-2024
Total Views |

vcc
 
 
मुंबई:सगळ्यांना ऑनलाईन व्यवहार करण्यात खूप सुलभता मिळते तसेच त्यांचे फायदे देखील आहेत इतके दिवस तुम्ही क्रेडिट कार्डबद्दल नक्कीच ऐकले असाल तर तुम्हाला सांगितले की वर्च्युअल क्रेडिट कार्डबद्दल सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
 
काय आहे वर्च्युअल क्रेडिट कार्ड आणि त्याचे फायदे काय जाणून घेऊयात
 
 
वर्च्युअल क्रेडिट कार्ड हा क्रेडिट कार्डचाच भाग असून ही क्रेडिट कार्डची डिजिटल आवृत्ती असते. या कार्डमार्फत तुम्हाला ऑनलाईन व्यवहार करणे सहज शक्य जाते. या वर्च्युअल क्रेडिट कार्ड (VCC) तुम्हाला बँक ऑफर करते. तुम्हाला हे कार्ड तुमच्या वास्तविक क्रेडिट कार्डशी संलग्न करून मिळते. हे लिंक केलेले कार्ड तुम्ही आपल्या व्यवहारासाठी विशेषतः इ कॉमर्स अथवा इतर डिजिटल सर्विसेस व्यवहारासाठी करू शकता.
 
कसे मिळते वीसीसी ?
 
तुम्हाला वर्च्युअल क्रेडिट कार्ड (VCC) मिळण्यासाठी प्रथम नैहमीचे क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे. या कार्डचा वापर लिंक करून तुम्ही वर्च्युअल कार्डचा वापर करु शकता. यात सेवा सुविधा यांचे पॅकेज बँकानुरूप असू शकते परंतु तुम्ही हे वीसीसी बँकेच्या आँनलाईन संकेतस्थळावर अथवा मोबाईल अँपमार्फत तुम्ही चालू करू शकता.एकदा कार्डची सुरूवात झाल्यानंतर हा सीवीवी (CVV) आधारित सिक्रेट पीन कोड व एक्सपायरी डेट अशी वैशिष्ट्ये असलेले हे कार्ड आपण वापरू शकतो.
 
व्यवहार कसे कराल ?
 
ऑनलाईन व्यवहार करताना वास्तविक क्रेडिट कार्डचा नंबर टाकण्याऐवजी वर्च्युअल क्रेडिट कार्डची माहिती टाकावी लागते. संबंधित व्यवहाराची किंमत क्रेडिट कार्ड अथवा बँक अकाऊंटमधून कापण्यात येते.
 
सिक्युरिटी फिचर्स -
 
हे क्रेडिट कार्ड सुरक्षित असून त्याचा सरलपणे वापर करू शकतो. कार्डचा नंबर तात्पुरता असतो जो कालारुपाने बदलतो.
 
वीसीसीचे फायदे -
 
१) वीसीसीचा नंबर तात्पुरता असल्याने यात घोटाळा होण्याची शक्यता अतिशय कमी असते त्यामुळे हे कार्ड अत्यंत सुरक्षित असते.
 
२) याद्वारे खर्चाला मर्यादा ठरवण्यात येते त्यामुळे मर्यादेबाहेर ग्राहक खर्च करू शकत नाही.
 
 
३) प्रत्यक्ष सगळीकडे कार्ड सोबत घेऊन जाण्याची गरज नाही
 
वीसीसीचे तोटे
 
१) हे कार्ड केवळ ऑनलाईन व्यवहारासाठी वापरता येते. मर्यादित काळापर्यंत उपलब्ध असते. त्यामुळे पुनर्वापर करण्यासाठी नवीन कार्ड घ्यावे लागते
 
 
२) सगळे मर्चंटस वीसीसी स्विकारत नाहीत.