"देवेंद्र फडणवीस हा पळणारा नव्हे तर लढणारा व्यक्ती!"

    08-Jun-2024
Total Views |
 
Fadanvis
 
मुंबई : देवेंद्र फडणवीस पळणारा नाही तर लढणारा व्यक्ती आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. शनिवारी दादर येथील भाजपच्या कार्यालयात विधिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "यशाचे बाप अनेक असतात. पण अपयश ताकदीने अंगावर घ्यायचं असतं, ते पचवायचं असतं आणि नवीन निर्धार करायचा असतो. या निवडणूकीत मी भाजपचं नेतृत्व केल्याने या अपयशाची जबाबदारी मी स्विकाली. त्यामुळे मला मोकळं करून काम करण्याची संधी द्या, असं मी सांगितलं. पण तेव्हा मी ते निराशेतून बोललो नाही. देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही. हा लढणारा व्यक्ती आहे. चारही बाजूने घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि नंतर पुन्हा ताकदीने मैदानात उतरून सर्व किल्ले जिंकणारे छत्रपती शिवराय हे आमची प्रेरणा आहेत. त्यामुळे कुणाला वाटलं असेल की, मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात बोललो, तर ते सत्य नाही."
 
हे वाचलंत का? - "मुल्ला मौलवींना पैसे वाटून ठाकरेंनी मतं मिळवली!"
 
"माझ्या डोक्यात काही स्ट्रॅटेजी होती. मी अमित शाहांना भेटून आलो आणि त्यांना माझ्या डोक्यात काय आहे ते सांगून आलो. पण त्यांनी मला सांगितलं की, सध्या हे सगळं काम चालूद्या. आपण नंतर आपण महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट तयार करू. त्यामुळे मी कुठल्याही परिस्थिती शांत बसणार नव्हतो. मी काम करणारच आहे," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "काही लोकं विजयाचा नरेटिव्ह तयार करतात. पण त्यांची बोलती बंद झाली आहे. त्यांना तीन निवडणूका मिळून जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा या एकाच निवडणूकीत भाजपला मिळाल्या आहेत. अख्ख्या इंडी आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा भाजपला मिळाल्या आहेत," असेही ते म्हणाले.