'एका युगाचा अंत', सुनील छेत्रीच्या निवृत्तीवर कलाकार भावुक

    08-Jun-2024
Total Views |
 
Sunil Chhetri
 
 
मुंबई : भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने अखेरीस आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली असूनभारत आणि कुवेत यांच्यातील फिफा विश्वचषक पात्रता फेरीत गुरुवारी छेत्री शेवटचा सामना खेळला. अभिमानाची बाब म्हणजे क्रिस्टियानो रोनाल्डो, अली दाई आणि लिओनेल मेस्सी यांच्यानंतर ३९ वर्षीय छेत्री जगातील चौथा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू मानला जातो. दरम्यान त्याच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार भावूक झाले आहेत.
 
क्रिकेटप्रमाणेच फुटबॉल देखील बऱ्याच जणांचा आवडीचा खेळ आहे. त्यामुळे सुनील छेत्रीच्या निवृत्ती निर्णयामुळे फुटबॉलच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. दरम्यान कलाविश्वातून देखील प्रितिक्रिया समोर येत आहे. अर्जुन कपूर, अभिषेक बच्चन यांसह अनेकांनी त्याच्यासाठी पोस्ट केल्या आहेत.
 
Sunil Chhetri 
 
अर्जुन कपूर फुटबॉलचा मोठा चाहता असून त्याने त्याच्या सोशल मीडियावर सुनील छेत्रीचा एका फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, ‘एका युगाचा अंत’, सुनील छेत्री धन्यवाद, आठवणी, उत्कटता आणि तुझ्या डेडीकेशनसाठी. तर अभिषेक बच्चनने आतापर्यंतच्या भारतीय खेळाडूंपैकी एक महान खेळाडू असा उल्लेख केला आहे. पुढे अभिषेकने म्हटलं आहे की, कॅप्टन तुझ्या या यशस्वी करिअरसाठी तुझं खूप खूप अभिनंदन. तुला देशासाठी खेळताना पाहणं हा आमच्यासाठी खूप अभिमानास्पद क्षण होता. देशातील एका महान खेळाडूला धन्यवाद. तसेच फरहान अख्तरने देखील सुनीलला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
 

Sunil Chhetri