चंद्राबाबू परतल्यावर अमरावती शहरात रिअल इस्टेट ३ दिवसांत १०० टक्क्यांनी वाढली

आयटी हब बनवण्यासाठी प्रयत्न चालू

    08-Jun-2024
Total Views |

Amravati
 
मुंबई: निवडणूकीचे वारे संपल्यावर तसेच निवडणूक निकालानंतर आता भारतीय रियल इस्टेट क्षेत्रात तेजी येण्याची शक्यता आहे. विशेषतः आंध्र प्रदेशात रिअल इस्टेटमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याला कारणही तसेच आहे. सार्वत्रिक लोकसभा व आंध्रप्रदेशातील विधानसभा या निवडणूका एकत्रित झाल्या होत्या ज्यामध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाला मोठे बहुमत मिळाले आहे.
 
२५ पैकी विधानसभेत १६ जागेवर चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाच्या विजयानंतर आंध्र प्रदेशातील अमरावती शहरात रिअल इस्टेटचे भाव थेट १०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. तीन दिवसात १०० टक्क्यांनी वाढ झाल्याने अमरावतीत जमीनीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ४ जूनला शेअर बाजार मोठ्या प्रमाणात पडले होते. ५ जूनला शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे २० लाख कोटींचे नुकसान झाले होते.
 
मात्र निकालानंतर पुन्हा एकदा एनडीए सरकार आल्यानंतर बाजारात वाढ झाली होती. ज्यामध्ये गुंतवणूकदारांनी पुन्हा आपले पैसै शेअर बाजारात निफ्टी सेन्सेक्स पुन्हा वाढल्याने वसूल केले होते. निकालानंतर अमरावती या आंध्र प्रदेशातील राजधानीत रिअल इस्टेट महागली आहे. कृष्णा नदीच्या काठावर वसलेले हे शहर गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात पायभूत सुविधेचे लाभार्थी ठरले होते. ज्यामध्ये तीन दिवसात या शहरातील रिअल इस्टेट १०० टक्क्यांनी वाढली आहे.
 
विशेषतः या शहरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली होती. याशिवाय आयटी हब होण्याच्या मार्गावर आता अडथळे देखील कमी झाले आहेत याआधी जगमोहन रेड्डी यांचे सरकार असताना तिथे तीन राजधानी बनवण्याचा त्यांचा मानस होता मात्र चंद्राबाबू नायडू सत्तेत परतल्यावर अनिश्चितता जाऊन अमरावती शहराला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.