आदिवासी क्रांती सेनेच्या भिवंडी, पालघरमध्ये दहा शाखांचे अनावरण

    08-Jun-2024
Total Views |

Image 22
 
ठाणे - आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भांगले यांच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी तरूणांनी संघटनेत प्रवेश केला असून भिवंडी आणि पालघर तालुक्यात सुमारे दहा शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी भिवंडी, वाडा आणि पालघर तालुक्यामध्ये आदिवासी क्रांती सेनेच्या वतीने मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी वाडा येथे आयोजित मेळाव्यात अनिल भांगले यांच्या नेतृत्वाखाली वाडा तालुक्यातील अनेक ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी क्रांतीसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
 
यावेळेस दयानंद हरळ यांची आदिवासी क्रांति सेना पालघर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तसेच वैभव सुरेश भोमटे यांची आदिवासी क्रांतिसेना पालघर जिल्हा उपाध्यक्षपदी संतोष जांजर यांची पालघर जिल्हा आदिवासी क्रांती सेना पालघर जिल्हा सचिव पदी प्रकाशजी हरळ यांची आदिवासी क्रांती सेना पालघर जिल्हा संघटक पदी अनंता सरडे आदिवासी क्रांती सेना वाडा तालुका कमिटी अध्यक्ष पदी संदीप दळवी आदिवासी क्रांती सेना वाडा तालुका कमिटी उपाध्यक्ष पदी संजय मोरगा.
 
आदिवासी क्रांती सेना वाडा तालुका कमिटी संघटक पदी जगन मोरे यांची आदिवासी क्रांती सेना वाडा तालुका कमिटी सचिव पदी संदेश वाघ यांची आदिवासी क्रांती सेना वाडा तालुका कमिटी उपसचिव पदी सुनील हरल यांची आदिवासी क्रांती सेना वाडा तालुका कमिटी संपर्क प्रमुख पदी; भिवंडी तालुकाध्यक्ष पदी संतोष पाडेकर; भिवंडी सचिवपदी बबलू पाटील, उपसचिव पदी गणेश हडल , दीपक धोदडे तर संघटनेच्या सल्लागार पदी सुनील भांगरे यांची निवड करण्यात आली.