आग्रा-लखनौ एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, ३० हून अधिक जखमी!

    08-Jun-2024
Total Views |
Accident At Agra Lucknow Expressway

लखनौ :
उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमधील आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वेवर दि. ८ जून २०२४ रोजी मध्यरात्री ३.३० वाजता भीषण अपघात झाला. बस चालकाला झोप लागल्यामने हा अपघात झाल्याची माहिती आहे. तरी या अपघातात भाविकांनी भरलेली बस पलटी झाल्याने ३० हून अधिक लोक जखमी आणि २ जणांचा मृत्यू झालेला आहे.

चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस एक्स्प्रेस वेवर पलटी झाली. दरम्यान अपघातातील जखमींना रुग्णालयाच दाखल करण्यात आले आहे. भाविकांनी भरलेली बस छत्तीसगडहून येत होती, ज्यात ६५ प्रवासी होते. त्यापैकी ३० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे कळते. ही घटना आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवरूल नसीरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माईलस्टोन ५१ येथे घडली. ते सर्व प्रवासी छत्तीसगडहून वैष्णवदेवीचे दर्शन घेऊन वृंदावनला आले होते. दरम्यान अपघाताच्या दिवशी ते छत्तीसगडला परत जात होते.