USA vs PAK Match : अखेर भारतीयांनीच नमवलं बाबरसेनेला; 'हे' खेळाडू ठरले मॅच हीरो!

    07-Jun-2024
Total Views |
icc-mens-t20-world-cup-pak-usa


मुंबई :      आयसीसी मेन्स टी-२० वर्ल्डकप सामन्यात अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव क्रिकेट विश्वाला धक्का दिला आहे. यासामन्यात अमेकिरेने पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला असून प्रथम गोलंदाजी करत अमेरिकेने पाकिस्तानला १५९ धावांवर रोखले. युएसए कप्तान मोनांक पटेलने अर्धशतकी खेळी करत सामना खेचून आणला.
दरम्यान, सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला विजयाकरिता १५९ धावांचे आव्हान देण्यात आले. विशेष म्हणजे अमेरिकेच्या विजयात सर्वाधिक योगदान देणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये कर्णधार मोनांक पटेल, डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावलकर, स्लो लेफ्ट आर्म स्पिनर नोस्तुषा प्रदीप केंजिगे यांचा समावेश आहे.
याशिवाय हरमीत सिंग, जसदीप सिंग, नितीश कुमार यांनीही महत्त्वाचे योगदान दिले. सामनावीर कर्णधार मोनांक पटेल ठरला त्याने शानदार अर्धशतक झळकावून अमेरिकन संघाला विजयापर्यंत नेले. अमेरिकन क्रिकेट संघाकडून पराभूत झालेला पाकिस्तानी संघ पराभूत होईल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती, पण ज्या भारतीय वंशाच्या खेळाडूंची चर्चा होत आहे, त्यात सौरभ नेत्रावलकर, मोनक पटेल, नस्तुषा प्रदीप केंझिगे यांचे विशेष योगदान राहिले आहे.