गायक चाहत फतेह अली खान ढसाढसा रडले; युट्युबने डिलीट केलं २८ मिलियन व्ह्यूजचे गाणं

    07-Jun-2024
Total Views |
 
rahat fateh ali khan
 
 
मुंबई : सोशल मिडियावर सध्या धुमाकुळ घालणारं गाणं बदो बदी हे सध्या चांगलंच चर्चेत आहे. पाकिस्तानी गायक चाहत फतेह अली खानने गायलेल्या या गाण्याला युट्यूबवर २८ मिलियन व्ह्युज होते. पण हे गाणं युट्यूबने चक्क डिलिट केलं आहे. आता त्यामागचं कारणही समोर आलं असून चाहत अली खान यांना रडू आवरलं नाही आहे.
 
 

rahat fateh ali khan 
 
गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत असलेलं ‘बदो बदी’ हे गाणं यूट्यूबवर ऐकता येणार नाही. चाहत फतेह अली खानने गायलेलं हे गाणं यूट्यूबने डिलीट केलं आहे. हे गाणं जुन्या काळातील ‘अख लडी बदो बदी’ या गाण्याचा रिमेक केलेलं गाणं होतं. हे गाणं खूप मजेदार शैलीत गायलं होतं. याला यूट्यूबवर कमी वेळेतच तब्बल १२८ मिलियन व्ह्यूज मिळाले होते. मिळालेल्या माहितीनुसार युट्यूबने कॉपी राइट्समुळे ही कारवाई केली आहे. हे गाणं बेकायदेशीरपणे, परवानगीशिवाय गायलं आणि नंतर यूट्यूबवर अपलोड करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे आणि याच कारणाने तब्बल १२८ मिलियन व्ह्यूज असलेलं हे गाणं युट्यूबने डिलीट करण्यात आलं आहे.