मुंबई-दिल्लीदरम्यान विशेष उन्हाळी ट्रेन

पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसवरून सुटणार

    07-Jun-2024
Total Views |
 Railway
 मुंबई: वांद्रे टर्मिनस आणि दिल्लीदरम्यान उन्हाळी स्पेशल ट्रेन चालवणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्याचा हेतू आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ट्रेन क्रमांक 04006/04005 वांद्रे टर्मिनस-दिल्ली सुपरफास्ट स्पेशल आठ ट्रिप चालविण्यात येणार आहेत.
 
या मार्गात ही गाडी बोरिवली, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, नडियाद, अहमदाबाद, गांधीनगर राजधानी, पालनपूर, अबू रोड, फलना, अजमेर, जयपूर, अलवर, रेवाडी, गुडगाव आणि दिल्ली कँट स्थानकावर दोन्ही दिशेने थांबेल. या ट्रेनमध्ये एसी 3 टायर डब्यांचा समावेश आहे.
 
ट्रेन क्रमांक 04006 वांद्रे टर्मिनस - दिल्ली सुपरफास्ट स्पेशल वांद्रे टर्मिनस येथून 06, 08, 10 आणि 12 जून 2024 रोजी 04.00 वाजता सुटेल. आणि दुसर्‍या दिवशी 06.00 वाजता दिल्लीला पोहोचेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक 04005 दिल्ली - वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल दिल्लीहून 04, 06, 08 आणि 10 जून 2024 रोजी 23.50 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी 01.55 वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल.