SNDT महिला विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु!

    07-Jun-2024
Total Views |

SNDT 
 
मुंबई : दक्षिण आशियातील पहिले महिला विद्यापीठ असलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठात (SNDT Womens University) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. मुंबईच्या भारतरत्न महर्षी कर्वे विद्याविहार चर्चगेट कँपस आणि जुहू कँपसाठी ही प्रवेशप्रक्रिया आहे. दरम्यान, इच्छूक विद्यार्थीनींनी चर्चगेट आणि जुहू आवारात प्रत्यक्ष आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. उज्वला चक्रदेव आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी केले आहे.
 
एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबईचे अभ्यासक्रम आणि सुविधा पुढीलप्रमाणे:
 
चर्चगेट संकुल
 
इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती, संस्कृत, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, कला व चित्रकला, संगीत, वाणिज्य, मार्गदर्शन व समुपदेशन, समाज कार्य, शिक्षण, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्र, ग्रंथालय व माहिती शास्त्र, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग.
 
कनाडियन स्टडी सेंटर, राष्ट्रीय सेवा योजना, शारीरिक शिक्षण, एसएनडीटी कला व वाणिज्य महाविद्यालय, पी.व्ही.डी.टी. महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, लीलाबाई ठाकरसी परिचारिका महाविद्यालय.
 
जुहू संकुल
 
गृहविज्ञान संशोधन, मानव विकास, कुटुंब संसाधन विकास, अन्न व पोषण विज्ञान, गृहविज्ञान विस्तार शिक्षण, वस्त्र व परिधान रचना, संगणक शास्त्र विभाग, शैक्षणिक तंत्रज्ञान, शिक्षण व्यवस्थापन विभाग, विधी महाविद्यालय, यू.एम.आय.टी. तंत्रज्ञान महाविद्यालय, एस.व्ही.टी. गृहविज्ञान महाविद्यालय, प्रेमलीला विठ्ठलदास तंत्रनिकेतन, सी.यू. सहा औषधनिर्माण महाविद्यालय.
 
विद्यापीठाची खास वैशिष्ट्ये:
 
प्रशस्त ग्रंथालये, नवोपक्रमशील शिक्षकवृंद, सेवेचा उत्कृष्ट अनुभव देणारे कर्मचारी, वसतिगृहाची सुविधा
विविध क्रीडा, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम.
सेमिनार हॉल, सुसज्ज वर्ग व प्रयोगशाळा, आरोग्य केंद्र, वनस्पती उद्यान.
संकुल निहाय बैंक, एटीएम आणि कॅम्पस प्लेसमेंट सुविधा.
 
महिला उद्योजकांसाठी:
 
WISE (महिला - नवप्रवर्तन - स्टार्टअप - उद्योजकता) इन्क्युबेशन सेंटर
महिला उद्योजकांच्या कल्पना विकसित करण्यासाठी सर्वोत्तम पायाभूत सुविधा व मार्गदर्शन.
चेतना (सेंटर फॉर होलिस्टिक एज्युकेशन, ट्रेनिंग अँड नॉव्हेल अडव्हान्समेंट्स)
एसएनडीटी महिला विद्यापीठाने ‘चेतना’ या केंद्राची स्थापना केली आहे. याचा उद्देश कौशल्य, मूल्याधारित आणि क्षमतावृद्धी अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थिनींना विविध कौशल्यांमध्ये पारंगत करणे आहे. या अभ्यासक्रमांची आखणी स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहयोगाने करण्यात आली आहे.
 
प्रवेश अर्जाची माहिती:
 
स्नातक (प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष) आणि स्नातकोत्तर (द्वितीय वर्ष) प्रवेश अर्जासाठी [sndt.digitaluniversity.ac](http://sndt.digitaluniversity.ac) यास भेट द्या.
 
स्नातकोत्तर (प्रथम वर्ष) प्रवेश अर्जासाठी [sndtadm.samarth.edu.in](http://sndtadm.samarth.edu.in) या संकेतस्थळाला भेट द्या.
 
या अभ्यासक्रमाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोबतच ज्या महिलांचे शिक्षण काही कारणास्तव पूर्ण झालेले नाही, अथवा नोकरीमुळे शिक्षण पूर्ण करता आलेले नाही, अश्या महिलांकरिता दूरस्थ शिक्षणाच्या (Distance Education ) माध्यमातून अनेक नवीन अभ्यासक्रमदेखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने B.A., B. Com., M. Com. आणि M.A. (इंग्रजी, मराठी, हिंदी, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
 
प्रवेशासंबधी तसेच अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
 
वेबसाइट - (sndt.ac.in)
ई-मेल - [email protected]
फोन:
चर्चगेट: ०२२-२२०८८८३७ / ८९२८३७७२२४
जुहू: ०२२-२६६०८८५५
पुणे: ०२०-२५४२४३९६ / ७८७५४०२३५१
श्रीवर्धन: ०२१४७ २२३४३२
चंद्रपूर: ०७१७२-२९९६५४/९८२२२९५७०७ / ९८८१३२३५४३