पार्किंगचा वाद आणि रस्त्यात मारामारी; रवीना टंडनने त्या प्रकरणावर सोडलं मौन

    07-Jun-2024
Total Views |
 
Raveena Tondon
 
 
 
मुंबई : अभिनेत्री रवीना टंडन आणि तिच्या ड्रायव्हरचे २ जून रोजीच्या रात्री रस्त्यात काही स्थानिकांशी भांडण झाले होते. यावेळी रवीना मद्यधुंद अवस्थेत आहे असे देखील आरोप तिच्यावर केले होते, शिवाय तिच्या ड्रायव्हरने त्या महिलांच्या अंगावर गाडी टाकल्याचे देखील म्हटले होते; पण या सगळ्या बाबी खोट्या असल्याचे सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन स्पष्ट झाल्या होत्या. आता या प्रकरणावर रवीना टंडनने मौन सोडलं आहे.
 
रवीना टंडनने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करून प्रतिक्रिया दिली आहे. “प्रेम, विश्वास आणि पाठिंब्यासाठी तुमचे खूप खूप आभार. ‘मोरल ऑफ द स्टोरी… आता डॅशकॅम आणि सीसीटीव्ही लावून घ्या,” अशी पोस्ट तिने केली आहे.
 
Raveena Tondon 
 
काय होतं प्रकरण?
 
अभिनेत्री रवीना टंडन नशेत होती आणि काही लोकांवर तिने हल्ला केला, असे खोटे आरोप करण्यात आले होते. या आरोपांवर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं असून रवीना किंवा तिचा ड्रायव्हर कुणीही नशेत नव्हते, असं त्यांनी सांगितलं. सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांव्यतिरिक्त घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीनेही सांगितलं की रवीना नशेत नव्हती.