इक्बाल मिर्ची प्रकरणात प्रफुल्ल पटेलांना दिलासा!

    07-Jun-2024
Total Views |
Praful Patel news

मुंबई : इक्बाल मिर्ची प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. ईडीच्या पीएमएलए कायद्यांतर्गत वरळीतील सीजे हाऊसमधील त्याच्या मालकीच्या १२व्या आणि १५व्या मजल्यावरील फ्लॅटची अटॅचमेंट रद्द केली. जप्त केलेल्या सीजे हाऊस फ्लॅटची किंमत १८० कोटी रुपये आहे. ईडीने २०२२ मध्ये ही मालमत्ता जप्त केली होती. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी पीएमएलए प्रकरणाबाबत या जप्तीच्या कारवाईविरोधात सेफेमा न्यायाधिकरणात अपील केले.

प्रफुल्ल पटेलांवर आरोप करण्यात आला होता की, दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय असणाऱ्या इक्बाल मिर्ची याची संपत्ती पटेलांनी खरेदी केली आहे. ईडीने ज्या मालमत्तेवर कारवाई केली त्या मालमत्तेचे दोन मजले इक्बाल मिर्ची यांच्या कुटुंबाचे असल्याचा आरोप आहे. ईडीने यापूर्वीच मालमत्ता जप्त केली आहे. मालमत्ता व्यावसायिक वापरात होती. इक्बाल मिर्चीसोबत करार करून ही मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप प्रफुल्ल पटेल यांच्यावर होता.