जरांगेंना धक्का! उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली; 'ही' आहेत कारणे!

    07-Jun-2024
Total Views |
Manoj Jarange Patil news

मुंबई :
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या दि. ८ जून रोजी होणाऱ्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. जरांगे पाटलांकडून सुरुवातीला ४ जून रोजी उपोषणाला सुरुवात करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. पण आचारसंहितेमुळे ४ जून रोजी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर जरांगेंनी ८ तारखेला उपोषणाला बसणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. पण आता ८ जूनला ही त्यांना उपोषणाला परवानगी देण्यात आलेली नाही.

अंतरवालीच्या गावकऱ्यांनी दि. ३ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले निवेदन तसेच आजूबाजूच्या गावातून देण्यात आलेल्या निवेदनामुळे प्रशासनाने जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता असल्याने परवानगी नाकारण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या कामांना अडथळा होऊ नये तसेच महिला व शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता ही परवानगी नाकारल्याची माहिती काही वृत्तसंस्थांनी दिलेली आहे. यासोबतच उपोषणकर्त्यांकडून उपोषणाच्या जागेबाबत ग्रामसभेचे कोणतेही कागदपत्र सादर न केल्यामुळे त्यांना ही परवानगी नाकारण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले आहे.