महाविकास आघाडी कपटनीतीने जिंकली

चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल

    07-Jun-2024
Total Views |
chandrashekhar
 
मुंबई : महाविकास आघाडी कपटकारस्थान करून, शकुनीनीतीने जिंकली आहे. संविधान बदलविणार, असा खोटा अपप्रचार केला. आम्ही विकसित भारतासाठी मत मागितले होते. मात्र, या निवडणुकीत जातीयवाद जिंकला आणि विकासाचा पराभव झाला, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवार, दि. 6 जून रोजी नोंदविली आहे. नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, महाविकास आघाडीने संविधान बदलणार असा अपप्रचार केला. पराभवाची कारणे अनेक असली, तरी आम्ही त्यावर आत्मचिंतन करीत आहोत.
 
आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात जास्तीतजास्त जागा जिंकण्यासाठी म्हणून जनतेच्या भावना दुखावल्या जातीच्या राजकारणात जनतेने मतदान केल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या भावना दुखावल्या आहेत. भाजपने जातीयवाद कधीही आणला नाही. मात्र विरोधकांनी जातीयवादावर निवडणूक लढवली. फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, त्यांनी सरकारमध्ये राहूनच काम करावे, अशी विनंती आम्ही केंद्राला केल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे संन्यास घेणार का? आशिष शेलार
 
देशात भाजप 45 च्या पुढे जाणार नाही, असा दावा करणारे उद्धव ठाकरे आता तोंड लपवत का फिरत आहेत? ते आता संन्यास घेणार का? असा सवाल भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी गुरुवार, दि. 6 जून रोजी उपस्थित केला. आशिष शेलार यांच्या जुन्या व्हिडिओचा दाखला देत, उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय, तेवढे सांगा, असा सवाल केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना शेलार म्हणाले की, ”व्हिडिओ संपूर्ण बघितला तर आपल्या लक्षात येईल की, आधी
 
महायुती प्रयत्न करणार आहे. महाविकास आघाडीने जातीयवादावर मत मागितले. एरव्ही भाजप जिंकली, तर ईव्हीएममुळे जिंकली, असा आरोप विरोधकांकडून केला जातो. आता राज्यात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले, तर ईव्हीएमबरोबर आहे का? ही काँग्रेसची दुहेरी नीती आहे. जनतेशी खोटे बोलून मत घेता. एकदा जनता भ्रमित झाली असली तरी आता दुसर्‍यांदा होणार नाही, असा हल्लाबोलही बावनकुळे यांनी केला.