चंडीगढ विमानतळावरील त्या हल्ल्यानंतर कंगनाने बॉलिवूडवरांवर डागली तोफ, Rafah चा उल्लेख करत म्हणाली...

    07-Jun-2024
Total Views |
 
kangana ranaut
 
 
मुंबई : अभिनेत्री आणि मंडी लोकसभेची नवनिर्वाचित खासदार कंगना राणावत हिच्यासोबत चंदीगढ एअरपोर्टवर एक धक्कादायक घटना घडली. एका CISF महिला जवानाने बेसावध असलेल्या कंगनाच्या कानशिलात लगावली. या घटनेचा सर्वच स्तरांतून निषेध करण्यात आला असून आता स्वत: कंगना हिने बॉलिवूडकरांवर डरकाळी फोडली आहे. तिच्यावर झालेल्या या हल्ल्यानंतरही बॉलिवूड गप्प राहिल्याने तिने तीव्र नाराजी व्यक्त केली.
 
कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत बॉलिवूडवर नाराजी व्यक्त केली. तसेच ज्यांनी 'All Eyes on Rafah' अशा पोस्ट केल्या होत्या, त्यांच्यावर राग व्यक्त केला. मात्र, ही पोस्ट नंतर कंगनाच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून काही काळाने काढून टाकण्यात आली. मात्र त्याचे काही स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत. यात कंगनाने लिहिले होते की, 'प्रिय फिल्म इंडस्ट्री, विमानतळावर माझ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर तुम्ही सर्वजण एकतर आनंद साजरा करत आहात किंवा पूर्णपणे शांत बसला आहात'.
 

kangana ranaut 
 
पुढे तिनं लिहिलं आहे की, 'पण एक गोष्ट लक्षात ठेवा... उद्या जेव्हा तुम्ही तुमच्या देशात किंवा जगात कुठेही फिरत असाल आणि मग अचानक एखादा इस्रायली किंवा पॅलेस्टिनी तुमच्यावर आणि तुमच्या मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल. कारण, तुम्ही रफावर झालेल्या इस्रायली हल्ल्याचा विरोध केला होता. तेव्हा मी तुमच्या हक्कांसाठी लढताना दिसेल. आज मी ज्या ठिकाणी आहे, तिथे मी का आहे, असा प्रश्न जर तुम्हाला कधी पडला. तर लक्षात ठेवा की, तुमच्यात कोणीही माझ्यासारखं नाही'.
 
 
 
कंगनाने पुढे असं देखील म्हटलं की, 'लवकरच 'इमर्जन्सी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये आपल्या विश्वासू आणि गणवेश परिधान केलेल्या सुरक्षा रक्षकांनी एका नि:शस्त्र महिलेला तिच्याच घरात कसं मारलं हे दाखवलं जाईल. एका वृद्ध महिलेला मारण्यासाठी 35 गोळ्या वापरल्या. शूर खलिस्तानींची ही कहाणी लवकरच प्रदर्शित होणार आहे'.