भारताच्या विदेशी मुद्रेत ऐतिहासिक वाढ - आरबीआय

विदेशी मुद्रेत ६५१.५ अब्ज डॉलर्सने वाढ

    07-Jun-2024
Total Views |

forex
 
 
मुंबई: भारताच्या विदेशी मुद्रेत (Foreign Exchange Reserves) मध्ये ६५१.५ अब्ज डॉलर्सने आतापर्यंत सर्वाधिक वाढ झाल्याचे आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी बोलताना सांगितले आहे. मे २०२४ पर्यंत ६४६.६७३ अब्ज डॉलर्सचा अंतिम अहवाला नंतर आता एकूण विदेशी मुद्रेची संख्या ४.८३ अब्ज डॉलर्सने वाढलेली आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी बोलता ना, 'हा नवा उच्चांक' असल्याचे स्पष्ट करत ३१ मे पर्यंत ६५१.५ अब्ज डॉलर्सची ऐतिहासिक वाढ झाल्याचे त्यांनी आज सकाळी प तधोरण जाहीर करताना सांगितले आहे.
 
कोणत्याही बाह्य क्षेत्रातील अडथळ्यांना तोंड देण्यासाठी अर्थव्यवस्थेच्या एकूण सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रमुख घटकांपैकी मानल्या जाणाऱ्या राखीव साठ्याचा मागील सर्वकालीन उच्चांक १७ मे रोजी $६४८.७ अब्ज होता. त्यांनी बोलताना बाह्य मुद्दे सध्या लवचिक असल्याचे विशद केले आहे.
 
तसेच बाह्य क्षेत्रातील मुद्दे विकासाला पुरक असल्याचे त्यांनी म्हटले होते. विशेषतः करंट अकाऊंट तूट, बाह्य देयेचा जीडीपीशी असलेले गुणोत्तर व आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीतील परिस्थिती यामध्ये प्रगती होत असल्याचे दास म्हणाले आहेत. ' एकंदरच आम्ही बाह्य गुंतवणूकीतील गरजेबाबत सकारात्मक आहोत' असे दास यांनी म्हटले आहे. यावर्षी आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये आर्थिक वित्तीय तूट मर्यादेत राहण्याची शक्यता असल्याचे एकंदर चित्र आहे.