"टकटक दिलेल्या वचनांचा कटाकट तुटण्याच्या आवाज येतोय का?"

भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा राहुल गांधींना टोला

    07-Jun-2024
Total Views |
 
Rahul Gandhi
 
मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राहुल गांधींच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच मोहब्बत दूकानों में नहीं मिलती और मोहब्बत की सौदेबाजी भी नहीं होती, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
 
 
 
चित्रा वाघ म्हणाल्या की, "टकटक दिलेल्या वचनांचा कटाकट तुटण्याच्या आवाज तुम्हाला येतोय का? राहुल गांधी तुम्ही गोर गरीब जनतेची फसवणूक करण्याचा वारसा बरोबर चालवत आहात. मोहब्बत की दुकान नावाची पाटी लावून भोळ्या भाबड्या जनतेला लुटण्याचा तुमचा धंदा पुन्हा एकदा उघड पडला. मोहब्बत नावाचं दुकान थाटून तुम्ही गोरगरीब माता भगिनींच्या विश्वासाचा सौदा केला आणि त्यांना फसवलं आहे. तुम्हाला माफी नक्कीच नाही."
 
हे वाचलंत का? -  एनडीएच्या बैठकीआधी मुख्यमंत्री शिंदेंचं विधान, म्हणाले, "आमचा उद्देश..."
 
"पण राहुल गांधी या माता-भगिनींच्या मागे भक्कमपणे त्यांचा बाप उभा आहे जो प्रेमाचा सौदा करत नाही, मात्र, न मागता, न सांगता बापाचं कर्तव्य बजावतो त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी. त्यामुळेच तुमचं मोहब्बत नावाच दुकान लवकरच बंद होणार आहे आणि नाही झालं तर ते आम्ही आमच्या माता भगिनींसाठी करू. कारण जनाब मोहब्बत दूकानों में नहीं मिलती और मोहब्बत की सौदेबाजी भी नहीं होती," असा खोटक टोलाही चित्रा वाघ यांनी राहुल गांधींना लगावला आहे.