ओटीटी विश्वातील मोठी बातमी - अमेझॉन MX Player चे अधिग्रहण करणार !

५० ते १०० दशलक्ष डॉलर्समध्ये व्यवहार होण्याची शक्यता

    07-Jun-2024
Total Views |

amazon mx player
 
 
मुंबई: ओटिटी विश्वातील मोठी बातमी पुढे येत आहे. व्हिडिओ ओटिटी सर्विसेस देणारी सुप्रसिद्ध कंपनी अमेझॉनने एमएक्स प्लेअर (MX Player) चे अधिग्रहण करण्याची शक्यता आहे. भारतात व्यवसायिक सेवा वाढवण्यासाठी तसेच व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय अमेझॉनकडून घेण्यात आला आहे.
 
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात एम एक्स प्लेअरमध्ये अमेझॉन प्राईम, मिनी टिव्ही एमएक्स प्लेअर व्हिडिओ युजर इंटरफेसमध्ये सुरू करण्यात येऊ शकते. प्रसारमाध्यमांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा एम एक्स प्लेअर ब्रँड अमेझॉन सुरू ठेवु शकतो.
 
अमेझॉन प्रवक्त्याने सांगितल्याप्रमाणे, 'आम्ही नेहमी मदत करणारी नवीन उत्पादने आणि सेवा सादर करण्याचे मार्ग शोधत असतो.आम्ही उत्कृष्ट स्थानिक मूळसह भारताचे मनोरंजन करणे सुरू ठेवण्यास उत्सुक आहोत.' असे म्हटले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या अधिग्रहणाचे (Acquisition) मूल्यांकन सुमारे ५० ते १०० दशलक्ष डॉलर्समध्ये करण्यात आले आहे. एम एक्स प्लेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी करणं बेदी अमेझॉनमध्ये समाविष्ट होऊ शकतात‌.
 
टाईम्स इंटरनेटच्या मालकीची एमएक्स प्लेअर ओटीटी सेवा आहे. यावर मात्र टाईम्सच्या प्रवक्त्याने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अहवालानुसार ओटीटी व्यवसायातील १५ टक्के मार्केट शेअर या एम एक्स प्लेअरचे आहे.