एनडीए सरकार पाच वर्ष पूर्ण करेल : उपमुख्यमंत्री अजित पवार

    07-Jun-2024
Total Views |
 
Ajit Pawar
 
नवी दिल्ली : एनडीए सरकार पाच वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारी नवी दिल्ली येथे एनडीएची बैठक आयोजित करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील या बैठकीकरिता दिल्लीत दाखल झाले आहेत.
 
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "एनडीए सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. आमच्याकडे जवळपास ३०० जागा आहेत. त्यामुळे आम्ही १०० टक्के पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहोत," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
 
हे वाचलंत का? -  SNDT महिला विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु!
 
दि. ४ जून रोजी लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून यात एनडीएला बहुमत मिळाले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. येत्या ९ जून रोजी हा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच शुक्रवारी पार पडलेल्या एनडीएच्या बैठकीत सर्व एनडीएच्या नेत्यांनी नरेंद्र मोदींची संसदीय दलाचे नेते म्हणून निवड केली आहे.