‘डेटा इंटेलिजन्स’ : यशस्वी लघु-मध्यम उद्योगांच्या पाऊलवाटा

    06-Jun-2024
Total Views |
Data Intelligence
 
 
मोहित सोमण
 
आजच्या माहिती-तंत्रज्ञान युगात डेटा हेच इंधन. त्यामुळे सर्वच क्षेत्रात कार्यरत कंपन्या या डेटाचा वापर अगदी खुबीने करताना दिसतात. त्यातच ‘अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस’ व ‘एस अ‍ॅण्ड पी मार्केट इंटेलिजन्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने जाहीर झालेल्या अहवालात, लघु व मध्यम उद्योगांकडूनही व्यवसायवाढीसाठी डेटाचा वापर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या निमित्ताने ‘डेटा इंटेलिजन्स’ आणि यशस्वी लघु-मध्यम उद्योगांच्या पाऊलवाटा यांचा धांडोळा घेणारा हा लेख...
 
माहिती व ज्ञान माणसाच्या जीवनाला पूरक बनवते. त्यातून अनेकदा मोठी सिद्धी प्राप्त करणेही शक्य होते. कुठल्याही व्यव सायात त्या त्या ’इंडस्ट्री’ची नेमकी माहिती व तंत्रज्ञानाच्या वापरातून ग्राहकसेवा, हे एखाद्या यशस्वी उद्योगपतीला अभिप्रेत असते. हीच गोष्ट जीवनाच्या कसोटीतही उपयोगी पडते. नवीन काळात केवळ ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अथवा केवळ ज्ञानाचा उप योग करून व्यवसायात फायदा होणार नाही, तर दोन्ही कलांचा मिश्रित वापर ग्राहकांच्या मागणीला ’मुहूर्त’ स्वरूप देते.अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस’ व ‘एस अ‍ॅण्ड पी मार्केट इंटेलिजन्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने एक अहवाल नुकताच जाहीर झाला.
 
यामध्ये छोट्या व मध्यम उद्योगांचा अहवाल मांडला आहे. या अहवालानुसार, लघु व मध्यम उद्योग (स्मॉल व मीडियम उद्योेग- एसएमबी) मध्ये डेटाचा योग्य विनियोग केला जात असल्याचे म्हटले आहे. आपल्या माहितीचा वापर करून प्रतिस्पर्ध्यांच्या एक पाऊल पुढे जात नवीन सेवा व उत्पादनाद्वारे ग्राहकांना सुखद अनुभव देत आहेत, असे निरीक्षण या अहवालात म्हटले आहे. . 
 
अहवालात एकूण २,३६२ एसएमबी कंपन्याच्या सर्व्हेतून निरीक्षण नोंदवले होते. यामध्ये पुढे आलेल्या माहितीनुसार,याविभागाती ल ६५ टक्के कंपन्या डेटाचा पुरेपूर वापर करत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना व्यवसायात मात देत आहेत.निरीक्षणात नोंदवलेल्या माहि तीप्रमाणे,केवळ ३३ टक्के कंपन्या डेटा (माहितीचा) वापर प्रभावीपणे करत नाही. म्हणजेच, उर्वरित कंपन्या माहितीचा वापर सेवे त सुधारण्यासाठी करतात. निम्म्याहून दुप्पट कंपन्या (६५ टक्के) कंपन्या मात्र माहितीच्या संधीचा वापर योग्य पद्धतीने करत पुढे जात आहेत.हा काळच उद्योजकांच्या तंत्रज्ञानक्रांतीचा काळ आहे.
 
आर्टिफिशियल इंटेलिजन्स’, ‘जनरेटिव्ह एआय’, ‘क्लाऊड नेक्स्ट’ अशा विविध तंत्रज्ञानाचा वापर व्यवसायात मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. केवळ लघु, सूक्ष्म, मध्यम नाही, तर अगदी छोट्या स्तरावरदेखील ग्राहकांची माहिती व्यवसायांना उपयोगी पडते. तसेच वैयक्तिक माहितीचा अंदाज बांधणे, व्यावसायिकाला ग्राहकांची आवडनिवड, पसंती, प्राधान्य याबद्दल माहिती मिळ णे अधिक सोपे जाते.याशिवाय ‘पर्सनल टच’ त्या ग्राहकाला आपल्या जवळदेखील आणतो.जेणेकरून तो ग्राहक दुसरीकडे वळ ण्यापेक्षा पुन्हा आपलाच ग्राहक बनेल, या आशेने अनेक उद्योजकांची पसंती व प्राधान्य ’माहिती’कडे असते.
 
या अहवालात म्हटल्याप्रमाणे, मोठ्या प्रमाणात नवउद्योगात ‘एआय’ व डेटाचा प्रभावीपणे वापर केला जातो. केवळ एआयचा वा पर करत ग्राहकांची नैसर्गिक माहिती अथवा आवडनिवड ओळखणे शक्य नाही किंवा नुसतीच माहिती असली तरी त्याचा (ग्राह कांचा) कल ओळखणे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा उपयोग करून अधिक प्रभावीपणे करणे उद्योजकाला शक्य होते.
 
‘डेमोग्राफिक्स’चा योग्य वापर केल्यास जागतिक कौल काय आहे व ग्राहकाचा कौल कुठल्या दिशेने आहे, याचा अंदाज माहिती जमवण्यासाठी उपयोगी पडतो. त्यांची केवळ साठवणूक करून नाही, तर वेळोवेळी ही माहिती अपडेट करणे महत्त्वाचे ठरते. अहवालातील माहितीप्रमाणे, अधिक माहिती अथवा योग्य डेटा असलेल्या ‘एसएमबी’च्या सेवा ग्राहकांच्या अधिक पसंतीस उत रतात.अनेकदा डेटा नसलेल्या कंपन्या मात्र ग्राहकांचे समाधान करण्यासाठी अपयशी ठरतात.त्याचा फायदा होत ६५ टक्के फायदा कार्यक्षमता वाढवून महसूल वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. बदललेला बाजारातील कल, तत्त्वे, पसंती, ग्राहकांची पार्श्व भूमी, आवडनिवड या अनेक गोष्टींची कल्पना या डेटामध्ये चाचपणे शक्य होते. अहवालातील माहितीप्रमाणे, ५५ टक्के कंपन्यां च्या उत्पादन खर्चात माहितीच्या आधारे कमी झालेली आहे.
 
मार्केटिंग करताना नेमका आपला लक्ष्यित ग्राहक (टार्गेट ऑडियन्स) ओळखणे सोपे जाते. ज्याचा मुख्य फायदा मार्केटिंग खर्चात कपात करण्यासाठी होतो. अनेकदा योग्य वस्तू, योग्य व्यक्ती, योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी अचूक माहिती प्रभावीपणे काम करते. पैशांचा व वेळेचा अपव्यय टाळून माहितीचा, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा वापर करत अनेक योग्य व्यक्ती अथवा लोकांच्या समूहाकडे जाणे सोपे पडते.
 
याच सर्व्हेमधील माहितीनुसार, ५२ टक्के उद्योजक ‘एआय’चा वापर माहिती मिळवण्या साठी करतात.आपला व्यवसाय समृद्ध करण्यासाठी देखील ‘एआय’ फायदेशीर ठरते. त्याचबरोबर या अहवालानुसार, ५३ टक्के व्यावसायिक आशय निर्मितीसाठी देखील ‘एआय’चा वापर करतात, तर ४१ टक्के लोक ‘एआय’चा वापर मार्केटिंग व जाहिरातींसाठी करतात.याचाच अर्थ आजही बर्‍याचशा उद्योजकांना मार्केटिंगचा प्रभावीपणे वापर करण्याची नामी संधी आहे. जे उद्योजक ‘एआय’चा वापर करतात, त्या उद्योजकांना वाढ मिळणे स्वाभाविक आहे. डेटामार्फत ‘कॉस्ट ऑप्टिमायझेशन’ करणे अधिक प्रभावीपणे होऊ शकते.
 
उदाहरणार्थ, एखाद्या उद्योजकाला त्याचा ‘सीआरएम’ (कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट) सॉफ्टवेअर माध्यमांमधून एखाद्या विशिष्ट व्यक्तीची व अथवा समूहाची माहिती मिळणे अधिक सोपे जाते. उदाहरणार्थ, एखादी अत्तर कंपनी पुरुष ग्राहकांसाठी न वीन उत्पादने बाजारात घेऊन आली, तर ३० ते ४० वयोगटांतील पुरुष हे त्यांचे लक्ष्यित ग्राहक आहेत. प्रत्येकाची इत्थंभूत माहिती असल्यास (जसे की वय, शिक्षण, निवासाचे ठिकाण, अनुभव, कामाचे स्वरूप) या गोष्टींचा ठावठिकाणा असल्यास त्याला एखाद्या विशिष्ट प्रकारचे अथवा त्याच्या साजेसे असे अत्तर त्याला विकण्यास सोपे जाते.
 
यामध्ये वाचणारा वेळ, प्रत्यक्ष मेहनत,मार्केटिंग वर कमी झालेला खर्च यामुळे भांडवलाची बचत होते. यापद्धतीने पुढे ‘एआय’चा वापर आपल्या उत्पादनासंबंधी ट्रेंडमध्ये झाल्या स बाजारातील गरज, पुरवठा, बाजारातील त्रुटी, फायदे, नुकसान या सगळ्या गोष्टींचे अनुमान बांधणे शक्य होते. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीला पिझ्झा-बर्गरमध्ये चालत असणारा कल जाणून घ्यायचा झाल्या स, सर्च इंजिनमध्ये त्यांचा वापर बाजारातील अनेक पिझ्झा बर्गरसंबंधित माहिती काढण्यासाठी केला जातो.
 
उदाहरणार्थ, एखादी कंपनी चांगली पिझ्झा बनवते का, त्यातले घटक पदार्थ काय, बाजारातील ग्राहक त्यावर काय प्रतिक्रिया देतोय, कंपन्या या उत्पादनाकडे कशा पद्धतीने बघत आहेत अथवा त्यात काय सुधारणा आवश्यक आहेत, काय त्रुटी आहेत, कुठल्या प्रदेशांत उत्पन्न गुंतवते, अशा अनेक गोष्टी ‘एआय’च्या एका क्लिकवर करणे शक्य होते.
 
अहवालातील माहितीप्रमाणे, ४१ टक्के लोक ‘एआय’चा प्रभावीपणे उत्पादन निर्मितीत व ग्राहकांची गरज समजून घेण्यास करत असल्याने बाजारात या कंपन्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अगदी टेलिकॉम क्षेत्रापासून आयटी, टेक्नोलॉजी, कंटेंट, प्रसारमाध्यमे, ‘एआय’, एमएसएमई अथवा डिजिटल मार्केटिंग, सर्व्हिसेस अशा क्षेत्रात ’डेटा’ महत्त्वाची भूमिका पार पडतो. या डेटाचे व ‘एआय’ तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढतच असल्याने आगामी काळात मोठी स्थित्यंतरे घडू शकतात.
 
परंतु, त्याची अंमलबजावणीही तितकीच महत्त्वाची. बरेचदा डेटा अचूक आहे अथवा नाही, यासंबंधी अडथळे येऊ शकतात. परं तु, योग्य वेळी डेटा बदलल्यास त्याचा परिणाम अंतिम वस्तू व सेवेत होतो. अशातच या अहवालाच्या माध्यमातून अनेक गोष्टी
स्पष्ट झाल्या आहेत. दिवसेंदिवस ‘डेटा इंटेलिजन्स’ चा वापर चालू असताना, याकडे सायबर सुरक्षितता महत्त्वाची ठरते. एखाद्या वैय क्तिक व संस्थात्मक डेटाचा वापर प्रत्यक्ष करताना नैतिकदृष्ट्या त्याचा योग्य वापर करणेही उद्योजकांची जबाबदारी आहे.
 
दिवसेंदिवस ही जबाबदारी अधिक मोठी बनत असताना सुरक्षित इकोसिस्टीम उभारणे, ही आपले आद्यकर्तव्य ठरणार आहे. डेमो ग्राफिक प्रणालीचाही अभ्यास चांगला माहीत असल्यास व्यवसायाची संहिता बनवणेदेखील तितकेच शक्य होईल, असे वाटते.