सामुहिक बलात्काराच्या प्रकरणात 'जिहादी मोहिम' उघडकीस; आतापर्यंत ७ जणांना अटक!

    06-Jun-2024
Total Views |
ajmer gangrape gang arrested

नवी दिल्ली :
अजमेरमध्ये गेल्या काही दिवसांपुर्वी अकरावीत शिकणाऱ्या मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्काराप्रकरणी आतापर्यंत ७ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात तक्रार दाखल होताच पोलिसांनी तिघांना अटक केली होती. तर १७ पोलिसांचे एसआयटी पथकं तयार केल्यानंतर ४ जणांना अटक करण्यात आली. त्यापैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. तर उर्वरित आरोपी इरफान, अरबाज, अस्लम, रज्जाक, मुबारक खान आणि इम्रान खान आहेत.

जिहादी मिशनचे हे प्रकरण अजमेरच्या क्रिश्चियनगंज पोलीस ठाण्यातील आहे. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, इरफानने पीडित मुलीला इंस्टाग्रामच्या माध्यमातून फसवून तिच्यावर सामुहिक बलात्कार करून तिचा व्हिडिओ बनवला. तसेच तिला ब्लॅकमेल करून लाखो रुपये लुटल्याचे उघड झाले आहे. पीडितेच्या वडिलांनी तक्रारीत असेही सांगितले की, इरफानशी मैत्री करण्यासाठी त्यांच्या मुलीवर तिच्या एका मित्राने दबाव टाकला होता. त्यानंतर ती या संपूर्ण जाळ्यात अडकली.
 
दरम्यान पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर सर्व आरोपी मिळून ही टोळी चालवत असल्याचे समोर आले आहे. एसपी देवेंद्र कुमार बिश्नोई यांनीही सांगितले आहे की, आतापर्यंतच्या तपासात एका संघटित टोळीचा सहभाग उघड झाला आहे. त्यांच्या जिहादी मिशनची चौकशी सुरु आहे. या टोळ्या अनेक मुलींच्या संपर्कात होत्या. त्यांच्या फोनवरून एकमेकांना अश्लील कमेंट्स, रील्स आणि अश्लील व्हिडिओ पाठवल्याचे पुरावे सापडले आहेत. हे आरोपी एकमेकांचे नातेवाईक असल्याचेही समोर आले आहे.

आरोपींना अश्लील व्हिडिओ पाहण्याची आणि ड्रग्ज घेण्याची सवय होती, असेही पोलिसांनी सांगितले आहे. त्यांच्या नेटवर्कबाबत पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. सामूहिक बलात्कारातील आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितेल. पंरतु या प्रकरणाचा तपास अद्याप सुरु आहे. आरोपींनी त्यांच्या मोबाईलमधून डेटा डिलीट केला असून, पोलिस डेटा परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळई हे लोक इंस्टाग्रामच्या माध्यमातून मुलींना फसवत आणि नंतर सापळ्यात अडकवून त्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचे तपास आणि पोलिसांच्या चौकशीतून स्पष्ट झाले आहे. हे सर्व आरोपी अनेक मुलींच्या संपर्कात असल्याचेही तपासात समोर आले आहे. याशिवाय ब्लॅकमेलिंग प्रकरणात आरोपींमध्ये माजी काँग्रेस नगरसेवक आणि गावातील रहिवाशांच्या नातेवाईकांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.