शाकाहारी थाळी महागली मांसाहारी थाळी झाली स्वस्त!

क्रिसिल अहवालातील माहिती समोर

    06-Jun-2024
Total Views |

thali
 
मुंबई: मागील वर्षाच्या तुलनेत शाकाहारी थाळी महाग झाली असून मांसाहारी थाळीत मात्र स्वस्त झाली आहे. यासंदर्भात नवीन अहवाल क्रिसील एमआय अँड ए रिसर्च रिपोर्ट (Crisil MI & A Research Report) मध्ये म्हटले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत शाकाहारी थाळी ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर मागील वर्षाच्या तुलनेत मांसाहारी थाळीत मात्र ७ टक्क्यांनी घट झाली आहे.
 
विशेषतः टोमॅटो, कांदे, बटाटा यांच्या किंमतीत वाढ झाल्याने त्याचा भार आता ग्राहकांना मोजावा लागणार आहे. बाकी भाजीपाल्या ची किंमत तुलनेने स्थिर राहिली असल्याचे अहवालात म्हटले आहे. मागील वर्षी कांद्याची आवकेत घट झाल्याने कांद्याच्या तुटवडा बाजारात झाला होता दुसरीकडे बंगाल मधील पिकांचे नुकसान झाल्याने व देशातील इतर रब्बी हंगामातील कारणांमुळे बाजारात बटाटा देखील महागला होता.
 
अहवालातील माहितीप्रमाणे, टोमॅटो, बटाटा, कांद्याच्या भावात अनुक्रमे ३९, ४१, ४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रब्बी पिकांच्या उत्पादनात देखील घट झाल्याने बाजारात या उत्पादनांचा तुटवडा झाला होता. ज्याचा परिणाम म्हणून हे पदार्थ बाजारात महागले आहेत. कृषी मंत्रालयाने नुकतेच कांद्याच्या उत्पादनात घट झाल्याचे भाकीत केले होते. तसेच टोमॅटो उत्पादनात देखील घट झाल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. दुसरीकडे ब्रोईलर किंमतीत १६ टक्क्यांनी घट झाल्याने मांसाहारी थाळीची किंमत घटली आहे.
 
मात्र, मासिक बदलाचा विचार केला असता, थाळींच्या किमतीत किरकोळ चढउतार होते; शाकाहारी थाळी १ टक्क्यांनी वाढली तर मांसाहारी थाळी १ टक्क्यांनी कमी झाली. बटाट्याच्या किमतीत ९ टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे शाकाहारी थाळीच्या किमतीत वाढ झाली, तर इतर महत्त्वाच्या घटकांच्या किमती तुलनेने स्थिर राहिल्या आहेत