कच्च्या तेलाच्या निर्देशांकात अनपेक्षित वाढ एमसीएक्सवर निर्देशांकात ०.५७ टक्क्यांनी वाढ

WTI Future व Brent क्रूड तेलाच्या निर्देशांकातही वाढ

    06-Jun-2024
Total Views |

Crude Oil
 
 
मुंबई: जागतिक पातळीवर ओपेक राष्ट्रांनी बैठकीत कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचे ठरवले असले तरी युएस  गॅसोलिनचा मुबलक साठा, मागणीत घट यामुळे बाजारात काही काळ तेलाच्या दरात कपात झाली असली तरी पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. दुसरीकडे EIA दिलेल्या अहवालात तेलाचा साठा अनपेक्षितरित्या वाढल्याचे सांगि तले होते मात्र तज्ञांच्या मते हा आकडा पुरेसा नसून मागणीच्या तुलनेत कच्च्या तेलाच्या साठ्यात घट झाली आहे.परिणामी बाजा रात कच्च्या (क्रूड) तेलाच्या निर्देशांकात वाढ झाली आहे.
 
सकाळी WTI Future क्रूड निर्देशांकात ०.५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर Brent क्रूड निर्देशांकात ०.४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange) क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.५७ टक्क्यांनी वाढ होत तेलाची पातळी ६२२५.०० प्रति बॅरेल पातळीवर पोहोचली आहे.
 
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी युएस फेडच्या व्याजदरात कपात होण्याची शक्यता असल्याने दोन तीन तृतीयांश तज्ञांनी दरात कपात होण्याची सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. यामुळेच आगामी काळात वाढलेल्या व्यवसायिक हालचालींमुळे तेलाच्या मागणीत वाढ होऊ शकते. US EIA (Energy Information Administration) संस्थेने क्रूड तेलाच्या सा ठ्यात १.२ दशलक्ष बॅरेल साठा वाढल्याचे सूचित केले होते जिथे बाजार तेलाच्या साठ्यात घसरणीची अपेक्षा करत होते.