भेलचा शेअर १४.५ टक्क्यांनी वाढला होता ' हे ' आहे कारण

अदानी कंपनीकडून ३५०० कोटींची ऑर्डर मिळाली

    06-Jun-2024
Total Views |

bhel
 
 
मुंबई: सकाळच्या सत्रात भेल (BHEL) कंपनीच्या समभागात १४.५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. मुख्यतः ही वाढ इंट्राडे ट्रेडिंगमध्ये झाल्याने समभाग (Share) २९२.३५ पर्यंत अप्पर सर्किटवर पोहोचला होता. अदानी कंपनीकडून ३५०० कोटींची १६०० मेगावॅट एम डब्लू (MW) पॉवर प्रकल्प बांधण्याची ऑर्डर कंपनीला मिळाल्याने शेअर मोठ्या प्रमाणात वाढला होता.
 
एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटल्याप्रमाणे, कंपनीला ही ऑर्डर बुधवारी मिळाली आहे. रायगड छत्तीसगडमध्ये हा प्रकल्प होणार आहे. ५जून २०२४ रोजी रायपूर, छत्तीसगड येथे सुपरक्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित २ * ८ ८०० मेगावॅट वीज प्रकल्पासाठी उपकरणे (बॉयलर,टर्बाइन,जनरेटर) पुरवठा आणि उभारणी आणि कार्यान्वित करण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. बॉयलर आणि टर्बाइन जनरेटर अनुक्रमे BHEL च्या त्रिची आणि हरिद्वार प्लांटमध्ये तयार केले जाणार आहेत,
 
अखेर बंद होताना हा समभाग ९.७ टक्क्यांनी वाढत २७८.५० रुपयांवर बंद झाला आहे. हा समभाग यावर्षी ४६ टक्क्यांनी आतापर्यंत वाढलेला आहे