शेअर बाजार अपडेट: मोदी पुन्हा सत्तेत आल्याने गुंतवणूकदारांचा आशा पल्लवित सलग दुसऱ्यांदा बाजारात वाढ सेन्सेक्स ८८१.८० अंशाने वाढला

बँक निर्देशांकासह मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये मोठी वाढ, एफएमसीजी, फार्मा समभागात घसरण

    06-Jun-2024
Total Views |

Stock Market
 
 
मुंबई: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सलग दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. बाजारातील परिस्थिती पुन्हा स्थिर स्थावर होण्याची चिन्हे असताना बाजारात सकाळच्या सत्रात रॅली झाली आहे. सेन्सेक्स ८८१.८० अंशाने वाढत ७५२६४.०४ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक २७८.४० अंशाने वाढत २२८९८.७५ पातळीवर पोहोचला आहे.
 
बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे २.९१ व ३.२४ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर निफ्टी मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये अनु क्रमे २.६५ व ३.७६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांक ६८६.३७ अंशाने वाढत ५६५१५.४२ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ५५७.४० अंशाने वाढत ४९६०२.०० पातळीवर पोहोचला आहे. दोन्ही बँक निर्देशांकात अनुक्रमे १.२३ व १.१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे तसेच मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये मिळालेल्या आधारामुळेही बाजारात मोठी वाढ झाली आहे.
 
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये एफएमसीजी (०.६४%), फार्मा (०.३८%) वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ पीएसयु बँक (४.६२%), मेटल (२.३८%), रियल्टी (४.१६%), कनज्यूमर ड्युरेबल्स (१.६२%), मिडिया (३.२४%) समभागात झाली आहे.
 
बीएसईत सकाळच्या सत्रात एनटीपीसी, एसबीआय,पॉवर ग्रीड, लार्सन, टाटा स्टील, एचसीएलटेक, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, इन्फोसिस, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, आयटीसी, विप्रो, मारुती सुझुकी, बजाज फिनसर्व्ह, टायटन कंपनी, अल्ट्राटेक सिमेंट, एक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, एचडीएफसी बँक या समभागात झाली आहे तर एचयुएल, नेस्ले, सनफार्मा, एशियन पेंटस, एम अँड एम, इंडसइंड बँक या समभागात नुकसान झाले आहे.
 
एनएसईत सकाळच्या सत्रात श्रीराम फायनान्स, एनटीपीसी, एसबीआय, कोल इंडिया, ओएनजीसी, बीपीसीएल, पॉवर ग्रीड, लार्सन,एसबीआय लाईफ इन्शुरन्स, अदानी एंटरप्राईज, अदानी पोर्टस, टाटा स्टील, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, ग्रासीम, टाटा मोटर्स, जेएसडब्लू स्टील, रिलायन्स, आयटीसी, मारूती सुझुकी, एचडीएफसी लाईफ, बजाज फिनसर्व्ह, विप्रो, डॉ रेड्डीज,कोटक महिंद्रा, टायटन कंपनी, बजाज ऑटो, टीसीएस,आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अपोलो हॉस्पिटल या समभागात वाढ झाली आहे.एचयुएल, हिरो मोटोकॉर्प, नेस्ले, डिवीज, सनफार्मा, हिंदाल्को, ब्रिटानिया, एम अँड एम,टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, इंडसइंड बँक या समभागात घसरण झाली आहे.
 
भारतीय जनता पार्टी प्रणित एनडीएचे सरकार पुन्हा स्थापन होत असल्याने पुन्हा गुंतवणूकदारांचा आशा पल्लवित झाल्या आहेत. बाजारात या कारणांमुळे पुन्हा एकदा स्थिरता येण्याची शक्यता आहे. परंतु स्वबळावर सरकार नसल्याने आगामी १०० दिवसांत सरकार कुठली आर्थिक धोरणे बनवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.