चांदीत मोठी दरवाढ ' इतक्या ' रुपयांनी चांदी महागली

एमसीएक्सवरील चांदी निर्देशांकात १.६१ टक्क्यांनी मोठी वाढ

    06-Jun-2024
Total Views |

silver
 
 
मुंबई: युएस यील्डमध्ये घसरण झाल्याने तसेच युएसमध्ये फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची शक्यता गुंतवणूकदारांनी नोंदवल्याने चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. आशियाई बाजारात निर्देशांकात ही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने चांदी महागली आहे.
 
चांदीचे दर' गुड रिटर्न्स' या संकेतस्थळावरील माहितीनुसार, प्रति किलो १८०० रुपयांनी महागले आहेत. १८०० रुपयांनी चांदी महागल्याने प्रति किलो किंमत ९१७०० वरून वाढत ९३५०० रुपयांवर पोहोचले आहेत.
 
दर प्रति किलो
 
दिल्ली - ९३५००
 
चेन्नई - ९८०००
 
मुंबई - ९३५००
 
बंगलोर - ९१०००
 
एमसीएक्सवरील चांदीच्या निर्देशांकात १.६१ टक्क्यांनी वाढ होत चांदी ९१९०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. चांदीच्या दरात अनेक कारणांमुळे वाढ झाली आहे. मुख्यतः आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावासोबतच प्रत्येक राज्यातील कर, देशातील कर, व डॉलर च्या किंमतीत होणारा बदल अशा अनेक कारणांमुळे सराफा बाजारात ही किंमत ठरत असते.