Nvidia कंपनीचा नवा विक्रम जागतिक पातळीवर बाजार भांडवलात क्रमांक दोनची कंपनी ' या' कंपनीला मागे टाकले

ॲपल कंपनीला मागे टाकत कंपनी क्रमांक दोनवर

    06-Jun-2024
Total Views |

nivida
 
 
मुंबई: चीपमेकर कंपनी Nvidia कंपनीने नवा विक्रम केला आहे. Nvidia कंपनीने बाजार भांडवल (Market Capitalisation) मध्ये ॲपल कंपनीला मागे टाकून एक नवा विक्रम केला आहे. Nvidia (एनविडिया) कंपनी जगातील क्रमांक दोनची सर्वाधिक बाजार भांडवल असणारी कंपनी बनली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चीप बनवणारी कंपनीने ३ ट्रिलियनचा टप्पा पार करत मोठी मुसंडी मारली आहे.
 
यापूर्वी ॲपल क्रमांक दोनची बाजार भांडवल असणारी कंपनी होती. काल एनविडिया समभागात (Stocks) मध्ये ५.२ टक्यांची वाढ होत किंमत १२२४.४० डॉलर प्रति शेअर पोहोचला होता. यामुळे कंपनीच्या बाजार भांडवलात ३.०१२ ट्रिलियन डॉलर्सने बाजार भांडवलात वाढ झाली आहे. Nvidia Corporation या कॅलिफोर्निया स्थित कंपनीच्या समभागात वर्षाला १४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.जगातील सर्वाधिक बाजार भांडवल असणारी सेमीकंडक्टर कंपनी म्हणून Nvidia कंपनी ओळखली जाते.
 
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स व नव तंत्रज्ञानाच्या मागणीमुळे कंपनीने मोठे लक्ष साध्य केले होते.ही कंपनी पहिला आयफोन येण्याच्या आधी २००२ साली स्थापन झाली होती. मायक्रोसॉफ्ट कंपनीहून अधिक मार्केट शेअर या कंपनीचे ए आय तंत्रज्ञानात आहे.
 
मूल्यातील ही वाढ २२ मे रोजी जाहीर झालेल्या Nvidia च्या आशावादी कमाईच्या अंदाजानुसार आहे, ज्यामुळे बाजारपेठेतील आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढला आणि समभाग जवळजवळ ३० टक्क्यांनी वाढला. शिवाय, ७ जून रोजी नियोजित असलेल्या कंपनीच्या नियोजित दहा-एक स्टॉक स्प्लिटमध्ये वैयक्तिक गुंतवणूकदारांकडून आणखी जास्त रस मिळण्याची अपेक्षा आहे.