निलेश लंकेंच्या पीएवर जीवघेणा हल्ला!

    06-Jun-2024
Total Views |

Nilesh Lanke 
 
अहमदनगर : लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर अहमदनगर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या पीएवर जीवघेणा हल्ला झाला आहे. गुरुवारी दुपारी हा हल्ला करण्यात आला असून लंके यांचे पीए राहुल झावरे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? -  नारायण राणे राज ठाकरेंच्या भेटीला!
 
अहमदनगच्या पारनेरमध्ये निलेश लंके यांचे पीए राहुल झावरे यांच्यावर ८ ते १० जणांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचे वाहनही फोडण्यात आले आहे. या हल्ल्यामध्ये राहुल झावरे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यासंदर्भात पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. नुकताच लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये अहमदनगर लोकसभेतून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी विजय मिळवला. त्यांच्या विरुद्ध महायूतीचे सुजय विखे मैदानात होते.