लव्ह जिहाद! आरिफने केले पीडितेचे बळजबरीने धर्मांतरण, त्यानंतर भाऊ तालिबने केला बलात्कार

    06-Jun-2024
Total Views |
 LOVE JIHAD
 
लखनौ : उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये लव्ह जिहादची घटना समोर आली आहे. बिहारमधील एका तरुणीला मोहम्मद आरिफने प्रेमाच्या जाळ्यात ओढून बळजबरीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले. आरिफचा भाऊ मोहम्मद तालिब यानेही पीडितेवर बलात्कार केला होता. तिने विरोध केला असता पीडितेला बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवार, दि. ४ जून २०२४ ला घडली. याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी हिंदू संघटनांनी प्रशासनाकडे केली आहे. सुन्नीनगर येथील रहिवासी असलेल्या पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, ती मूळची बिहारमधील नवादा जिल्ह्यातील आहे.
 
 
ही महिला दिल्लीत राहायची आणि नोकरी करायची. येथेच तिची उत्तर प्रदेशातील बरेली येथील रहिवासी असलेल्या मोहम्मद आरिफशी भेट झाली. काही वेळानंतर आरिफने तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. येथून त्याने महिलेला बरेली येथील आपल्या घरी आणले. या काळात त्याने महिलेवर अनेकवेळा बलात्कार केला. सुमारे एक वर्षापूर्वी आरिफने पीडितेला इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले.
 
इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर आरिफने पीडितेचे नाव सना ठेवले आणि त्यानंतर तिच्याशी लग्न केले. ४ जून (मंगळवार) रोजी पीडित मुलगी घरी एकटीच होती, असा आरोप पीडितेने केला आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास आरिफचा भाऊ मोहम्मद तालिब पीडितेच्या खोलीत शिरला. त्याने पीडितेसोबत अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. महिलेने विरोध करूनही तालिबाने तिच्यावर बलात्कार केला.
 
 
जेव्हा पीडितेने तिला तक्रार करण्याचा इशारा केला तेव्हा तालिब म्हणाला, “तू बिहारची आहेस. हे तू कोणाला सांगितल्यास मी तुला मारून टाकीन.” पीडितेने कशीतरी रात्र काढली आणि दुसऱ्या दिवशी ५ जून (बुधवार) रोजी आरिफ घरी आल्यानंतर तिने तिचा भाऊ तालिबच्या कृत्याबद्दल त्याला सांगितले. आरिफने भावाची बाजू घेत पीडितेवर आरोप केले.
 
यानंतर आरिफने त्याचा भाऊ तालिब आणि वडील साबीर इस्लामसह पीडितेला बेदम मारहाण केली. या सर्वांनी महिलेला शिवीगाळ केली आणि म्हणाले, “जर तू याबाबत कोणाकडे तक्रार केलीस तर आम्ही सर्व मिळून तुला जाळून टाकू. तुझा मृतदेहही सापडणार नाही. आरोपी अतिशय दबंग आणि गुन्हेगारी प्रकारचा असल्याचे सांगून महिलेने तिच्या हत्येची भीतीही व्यक्त केली आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडितेने केली आहे.