चेंबूरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट; ९ जण जखमी

स्फोटानंतर आग लागल्याने या घटनेत दहा जण जखमी

    06-Jun-2024
Total Views |

LPG


मुंबई, दि.६ : प्रतिनिधी 
मुंबईतील चेंबूर परिसरात गुरुवार दि. ६ रोजी सकाळच्या सुमारास घरगुती सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटानंतर आग लागल्याने या घटनेत ९ जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना चेंबूरच्या सी जी गिडवाणी मार्गावरील एका घरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, स्मोक हिल सलूनच्या मागे, गोल्फ क्लबच्या जवळ, सी.जी. गिडवाणी रोड, चेंबूर येथील एका घरात सकाळी साडेसातच्या सुमारास घरगुती सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे घटनास्थळी आग लागली. त्यामुळे घराचेही नुकसान झाले. यात ९ जण जखमी झाले आहेत. स्फोट आणि आगीची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेत जखमींना गोवंडी येथील शासकीय शताब्दी रुग्णालयात दाखल केले. या घटनेतील जखमींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या घटनेत १० जण जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये 1) ओम लिंबाजिया, (९वर्षे), अजय लिंबाजिया, (वय ३३) वर्ष, पूनम लिंबाजिया, (वय ३५), मेहक लिंबाजिया, (वय ११), ज्योत्स्ना लिंबाजिया (वय ५३ वर्षे), पियुष लिंबाजिया, (वय २५), नितीन लिंबाजिया, (वय ५५), प्रीती लिंबाजिया, (वय ३४) हे जखमी आहे. यातील सुदाम शिरसाट यांच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली असून त्यांना सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, हा स्फोट नेमका कशामुळे झाला? याचा तपास अधिकारी करत आहेत.