एनडीए सरकार स्थापनेपूर्वी जेडीयूची मागणी, 'अग्निवीर आणि UCC....'

    06-Jun-2024
Total Views |
JD(U) Wants Review Of Agnipath Scheme

नवी दिल्ली : एनडीए सरकारचा शपथविधी होण्याआधी घटक पक्षांनी आपल्या मागण्या एनडीए सरकारच्या नेतृत्वापुढे मांडल्या आहेत. एनडीएचा घटक पक्ष असणाऱ्या जेडीयूने मोदी सरकारद्वारे आणलेल्या अग्निवीर योजनेबद्दल विचार करण्याची आणि समान नागरी कायद्यात बदल करण्याची मागणी केली आहे. मात्र अनेक मुद्यांवर जेडीयुने भाजपचे समर्थन केले आहे.

जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी एनडीए सरकार स्थापनेपूर्वी दिलेल्या निवेदनात अनेक मुद्द्यांवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. केसी त्यागी यांनी माध्यमांना सांगितले की, अग्निवीर योजनेबाबत मतदारांमध्ये नाराजी आहे. आमच्या पक्षाला आमच्या पक्षाला या त्रुटी दूर कराव्यात अशी इच्छा आहे. जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांनी समान नागरी कायद्यावर एक पत्र लिहिले आहे. त्यातील सर्व कमतरता ओळखून त्यावर काम केले जावे, असे त्यात लिहले आहे.

एकीकडे जेडीयूने अग्निवीर योजना आणि समान नागरी कायद्याबाबत पुनर्विचार करण्याबाबत आणि त्यातील उणीवा दूर करण्याबाबत भाष्य केले आहे. तर दुसरीकडे एक देश, एक निवडणुक सारख्या मुद्यांवर सहमती दर्शवली आहे. जेडीयूने समान नागरी कायद्याला ही पाठिंबा दर्शवला, मात्र संबधितांशी चर्चा करायची आहे, असे सांगितले.
 
जेडीयू सत्ताधारी एनडीएचा भाग आहे आणि बिहारमध्ये २०२४च्या लोकसभा निवडणुकीत १२ जागांवर जेडीयूचे उमेदवार विजयी झाले आहेत. ते एनडीए आघाडी सरकारचा एक महत्त्वाचा भाग आहेत. २४० जागा असलेल्या भाजपला बहुमत मिळवण्यासाठी त्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर JDU अग्निवीर योजनेवर पुनर्विचार करेल, अशी मागणी आहे.