मे महिन्यात देशाचे जीएसटी कलेक्शन १.७३ लाख कोटी महाराष्ट्राचे कलेक्शन १४ टक्क्यांनी वाढले

देशाच्या कलेक्शनमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर १० टक्क्यांनी वाढ

    06-Jun-2024
Total Views |

gst
 
मुंबई: जीएसटी (GST) संग्रहणात (Collection) मध्ये इयर ऑन इयर (YoY) बेसिसवर वाढ झाली आहे. मे महिन्यात जीएसटी संग्रहणात १० टक्क्यांनी वाढल्याचे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे. मे महिन्यात जीएसटी (Goods and Services Tax) मध्ये १.७३ लाख कोटींपर्यंत पोहोचले आहे मागील महिना एप्रिलमध्ये २.१० लाख कोटी संग्रहणाचा नवा विक्रम नोंदवला होता.आपल्या निवे दनात वित्त मंत्रालयाने म्हटले आहे की, 'मे महिन्यात जीएसटी कलेक्शन १.७३ लाख कोटीवर पोहोचले आहे.'
 
देशांतर्गत व्यवहार वाढल्याने १५.३ टक्क्याने जीएसटी संग्रहण झाले आहे तर आयातीतील व्यवहारात ४.३ टक्क्यांनी घसरण झाल्यानें हे संग्रहण वाढले आहे. एकूण जीएसटी संग्रहण आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी ३.८३ लाख कोटी झाले आहे. यामध्ये घरगुती अथवा देशांतर्गत व्यवहारात १४.२ टक्यांने वाढ झाली आहे तर आयातीत १.४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. या आर्थिक वर्षात इयर ऑन इयर बेसिसवर मेपर्यंत ११.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
मे महिन्यातील जीएसटी संग्रहण पुढीलप्रमाणे-
 
केंद्र सरकार जीएसटी (CGST) - ३२४०९ कोटी
 
राज्य सरकार जीएसटी (SGST) - ४०२६५ कोटी
 
इंटिग्रेटेड ( एकत्रित) जीएसटी (IGST) + ८७७८१ कोटी
 
सेस - १२२८४ कोटी
 
 
मे पर्यंत आर्थिक वर्ष २०२४-२५ पर्यंतचा जीएसटी
 
केंद्र सरकार जीएसटी (CGST) - ७६२५५ कोटी
 
राज्य सरकार सेंट्रल जीएसटी (SGST) - ९३८०४ कोटी
 
इंटिग्रेटेड जीएसटी -१८७४४० कोटी
 
सेस - २५५४४ कोटी
 
इयर ऑन इयर बेसिसवर महाराष्ट्राच्या जीएसटी संग्रहणात १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्ष २०२३-२४ वर्षाच्या २३५३६ कोटीवरून आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये २६८५४ कोटींवर पोहोचले आहे.