इंडी आघाडीच्या उमेदवाराच्या समर्थकांची हुल्लडबाजी! महिलांना अश्लील इशारे - व्हिडिओ

    06-Jun-2024
Total Views |
Imran Masood news

उत्तर प्रदेश :
उत्तर प्रदेशच्या सहारनपुर लोकसभेमध्ये काँग्रेसचे उमेदवार इमरान मसूद यांच्या विजयानंतर मसूदच्या समर्थकांनी रस्त्यांवर हुल्लडबाजी करत महिलांना अश्लील इशारे केले. त्यांचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, मसूदचे समर्थक बाईकस्वारी करत हुलडबाजी करत होते. एका-एका बाईकवर चार-चार लोक बसले होते. यात चारचाकी वाहनांचा ही समावेश होता.
 
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पश्चिम उत्तर प्रदेशातील लोकांनी पुन्हा एकदा अराजकता पसल्याची चिंता व्यक्त केली. तरी पोलीसांनी या व्हिडिओच्या आधारे ५ नावाजलेल्या आणि ५० अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. गोंधळ घालणाऱ्यांची ओळख पटवण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या रॅलीत १५० बाईकस्वार सहभागी झाले होते.
 
कुतुबशेर पोलिस ठाण्यासमोर दुचाकीवरून आलेल्या हुलडबाज समर्थकांचा ताफा आला आणि महिलांशी अश्लील हावभाग करत मसूदच्या समर्थकांनी हुल्लडबाजी केली. यावेळी पोलीस हतबल दिसून आले. सहारनपूर शहरातील एका व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट करून कारवाईची मागणी केली आहे. यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काँग्रेस-समाजवादी पक्षाच्या युतीने पश्चिम उत्तर प्रदेशातील सहारनपूर लोकसभा मतदारसंघातून इमरान मसूद यांना उमेदवारी दिली होती. या लोकसभा निवडणुकीत त्यांना मोठा विजय मिळाला आहे. इमरान मसूद यांना ५,४७,९६७ मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे राघव लखनपाल शर्मा यांना ४,८३,४२५ मते मिळाली. अशा प्रकारे इमरान मसूद ६४,५४२ मतांनी विजयी झाले. ज्यामुळे त्यांच्या समर्थकांनी हुल्लडबाजी केली.