IPO Update: ixigo कंपनीचा आयपीओ १० जूनपासून बाजारात किरकोळ गुंतवणूकदारांसाठी १० टक्के वाटा उपलब्ध

प्राईज बँड ८८ ते ९३ रुपये प्रति शेअर निश्चित

    06-Jun-2024
Total Views |
ipo
 
 
मुंबई: ixigo (Le Travenues Technology Ltd) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होणार आहे. १० ते १२ जून या कालावधीत आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला असणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओसाठी १.२९ कोटी समभाग (Shares) गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहेत. १३ जूनपर्यंत कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे.
 
१८ जूनपासून बीएसई (BSE) व एनएसई (NSE) या दोन्ही बाजारात ही कंपनी नोंदणीकृत होणार आहे. कंपनीने आयपीओसाठी ८८ ते ९३ रुपये प्रति समभाग इतका प्राईज बँड निश्चित केला आहे. एका समभाग गठ्ठा ( Lot) १६१ समभागाचा असेल.गुंतवणूक दारांना आयपीओसाठी कमीत कमी १४९७३ रुपयांचा गुंतवणूक करावी लागणार आहे. Axis Capital Limited, Dam Capital Advisors Ltd, JM Financial Limited या कंपनी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून या आयपीओसाठी काम पाहणार आहेत.Link Intime India Ltd ही कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे.
 
कंपनीकडून आयपीओसाठी समभागाचे वाटप १३ जूनपर्यंत करणे अपेक्षित आहे. पात्र न ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा १४ जूनपर्यंत करण्यात येणार आहे. कंपनीने आयपीओपैकी ६२० कोटींचे (६६६७७६७४ शेअर्स) बँक ऑफर फॉर सेल (OFS) म्हणून ठेवण्यात आलेले आहेत. एकूण आयपीओपैकी ७५ टक्के वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) यांच्या साठी उपलब्ध असणार आहे. तर एकूण गुंतवणूकीपैकी १० टक्के वाटा गुंतवणूकीसाठी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी(Retail Investors) यांच्यासाठी उपलब्ध असणार आहे. १५ टक्के वाटा विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) उपलब्ध असणार आहे.
 
ही कंपनी २००६ साली स्थापन झाली होती. मुख्यतः ही कंपनी ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सी (OTA) आहे. या मार्फत ग्राहक रेल्वे, विमान, बस यांची तिकीटे बुक करू शकतात. तसेच हाँटेल बुकिंग, व तत्सम पर्यटन सुविधा कंपनी पुरवते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ३१ मार्च २०२३ मधील ५७.५७ कोटींचा महसूल ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत घटत ४९७.१० कोटींवर पोहोचला आहे तर करोत्तर नफ्यात (Profit After Tax) ३१ मार्च २०२३ मध्ये २३.४० कोटी होते जे ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढत ६५.७१ कोटींवर पोहोचला आहे.
 
कंपनीचे बाजार भांडवल डिसेंबर ३१, २०२३ पर्यंत (Market Capitalisation) ३६०३.०४ कोटी रुपये आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर वर्किंग कॅपिटल गरजेसाठी व क्लाऊड मूलभूत सुविधा ( Infrastructure) व तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी, अधिग्रहण व धोरणात्मक गुंतवणूकीसाठी व इतर दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.