भायखळा स्थानकावर नवे स्वच्छतागृह

रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी स्वच्छता गृहाची उभारणी

    06-Jun-2024
Total Views |

bhaycula

मुंबई, दि.६ : प्रतिनिधी 
मध्य रेल्वेने लोकल रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने भायखळा स्थानकावर फलाट क्रमांक १ वर नवीन स्वच्छतागृहाची उभारणी केली आहे. भायखळा येथील अमृत स्थानक योजनेअंतर्गत पुरुषांसाठी ०२ शौचालय आणि दिव्यांगजनांसाठी ०१ प्रसाधनगृह आणि महिलांसाठी १ , महिला दिव्यांगांसाठी ०१ स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. या योजनेच्या अंतर्गत अजून २ शौचालयाचा स्थानकावर समावेश आहे. एक फलाट नंबर १ वर (कल्याण च्या शेवटी) आणि दुसरा प्लेटफॉर्म नंबर ४ वर (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या शेवटी) जवळपास तयार आहेत. हे स्वछतागृहे देखील लवकरच सार्वजनिक वापरासाठी उघडले जातील.

ही शौचालये सीवेज ट्रीटमेंट प्लांटला जोडलेली आहेत आणि मध्य रेल्वे अंतर्गत पाच वर्षांच्या कालावधीसाठी डी मार्ट फाउंडेशन द्वारा त्यांची देखभाल केली जाईल. मध्य रेल्वेचे श्री राम करन यादव, महाव्यवस्थापक, यांनी दि.३ जुनरोजी भायखळा स्थानकाची पाहणी केली आणि या सुविधा आणि स्थानकावरील इतर प्रवासी सुविधांचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान मुंबई विभाग, विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल आणि विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.