झारखंडमध्ये भाजप-आजसू आघाडीची बाजी

सोरेन यांच्याप्रति सहानुभूतीची लाट नाहीच

    06-Jun-2024
Total Views |
 
 
 
 
Hemant sore
 
 मुंबई, : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर झारखंडमध्येही भाजपला काहीसा फटका बसल्याचे चित्र दिसून आले. एकूण 14 जागांपैकी भाजपला आठ, काँग्रेसला दोन, तर झारखंड मुक्ती मोर्चाला तीन आणि आजसू पक्षाला एक जागेवर विजय मिळाला आहे. त्यामुळे झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या महादेव अ‍ॅप घोटाळ्याप्रकऱणी तुरुंगात असलेल्या हेमंत सोरेन यांच्याप्रति सहानुभूती मतदारांमध्ये दिसून आलेली नाही.
 
2019च्या सार्वत्रिक निवडणुकीत, भाजपने झारखंडमधील एकूण 14 जागांपैकी 11 जागांवर विजय मिळाला होता. त्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या तीन जागा घटल्या. तसेच या निवडणुकीत भाजपला 51.6 टक्के मते मिळाली होती, तर काँग्रेसला 15.8 टक्के मते मिळाली होती, तर झारखंड मुक्ती मोर्चाला 11.7 टक्के मते मिळाली होती. आठ जागांवर भाजपचे प्राबल्य गोड्डा, चत्रा, कोडरमा, धनबाद, रांची, जमशेदपूर, पलामू, हजारीबाग, गिरीडीह या मतदारसंघांत भाजप-आजसू पक्षाचे प्राबल्य दिसून आले, तर खुंटी, लोहदरगा, राजमहल, दुमका, सिंहभूम मतदारसंघात इंडी आघाडीला यश मिळाले आहे.
भाजप उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी
 
झारखंडच्या गोड्डा मतदारसंघातून भाजपचे निशिकांत दुबे 1 लाख 1 हजार 813 मतांसह विजयी झाले आहेत. तृणमूलच्या माजी खासदार महुआ मोईत्रा यांचे प्रकरण पहिल्यांदा लोकसभेच्या पटलावर मांडणारे भाजपचे खासदार निशिकांत दुबे या निवडणुकीत पुन्हा विजयी झाले आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या प्रदीप यादव यांचा 1 लाख 1 हजार 813 मतांनी पराभव केला. तसेच, माजी शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णादेवी यांनीदेखील 3 लाख 77 हजार 14 मतांनी कम्युनिस्ट पक्षाच्या विनोद कुमार सिंग यांचा पराभव केला.