एनडीएकरिता चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार ठरणार किंगमेकर!

    05-Jun-2024
Total Views |
chandrababu-naidu-tdp-nitish-kumar-jdu-kingmaker-nda



नवी दिल्ली :
     लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपला बहुमतापासून दूर राहावे लागत आहे. एनडीएला सत्तास्थापन करण्यासाठी मित्रपक्षाची गरज भासणार असून जेडीयू व टीडीपी या दोन पक्षांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. चंद्राबाबू नायडू(टीडीपी) तर नितीश कुमार(जेडीयू) हे दोघही किंगमेकर ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


दरम्यान, आंध्र प्रदेशमध्ये सत्ता मिळविणारे चंद्राबाबू नायडू व बिहारमध्ये सत्तेत असणारे नितीश कुमार या दोघांची भूमिका सत्तास्थापनेत महत्त्वाची ठरणार आहे. विशेष म्हणजे नितीश कुमार दबावाचे राजकारण करण्यात माहीर असल्याचे बोलले जात असले तरी चंद्राबाबू नायडूंना नेहमीच किंगमेकरची भूमिका बजावायची होती. ती संधी यानिमित्ताने त्यांच्यासमोर आली आहे.


नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू: एनडीएचे किंगमेकर

लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या. चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने १७५ पैकी १३५ जागा जिंकून एकहाती बहुमताचा आकडा पार केला. त्यांच्यासोबत अभिनेता पवन कल्याणच्या 'जनसेना पार्टी'ने २१ जागा जिंकल्या आहेत तर युतीचा भागीदार भाजपलाही ८ जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे, नितीशकुमार हे गेल्या ९ महिन्यांचा अपवाद वगळता गेली १९ वर्षे बिहारचे मुख्यमंत्री आहेत. जून २०१३ पर्यंत ते भाजपसोबत होते, त्यानंतर ते राजदसोबत गेल्याचे पाहायला मिळाले होते.