ज्येष्ठ इतिहास आणि नाणेतज्ञ आप्पासाहेब परब यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

    05-Jun-2024
Total Views |
 
appa parab
 
मुंबई : संस्कृती परिवार सामाजिक संस्थेतर्फे संपूर्ण भारतात विविध सांस्कृतिक तसेच सामाजिक उपक्रम राबवले जातात. शिवराज्याभिषेक या घटनेला दिनांक 6 जून 2024 रोजी 350 वर्षे पूर्ण होत आहेत, म्हणूनच संस्कृती परिवार सामाजिक संस्था ठाणे तर्फे शिवराज्याभिषेक स्मृती सोहळा आयोजन करण्यात आले आहे. या दिनाचे औचित्य साधून ठाण्यात होणाऱ्या कार्यक्रमास नाणेतज्ञ आप्पासाहेब परब यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम संपूर्ण दिवसाचा असून श्री आनंद भारती व्यायाम शाळा ठाणे पूर्व येथे संपन्न होणार आहे.
 
सकाळी सहा ते साडेसात पर्यंत गणपती पूजन पुण्याहवाचन, मातृकापूजन, महादेव पूजन, अभिषेक, महाराजांवर अभिषेक, आरती, मंत्रपुष्पांजली झाल्यानंतर आठ ते साडेआठ अल्पोपहार ठेवण्यात आलेला आहे. नऊ वाजता मुख्य कार्यक्रमास सुरुवात होऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सत्कार व इतिहास व नाणे तज्ञ आप्पासाहेब परब यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. हा पुरस्कार डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. त्यानंतर साडेनऊ ते साडेदहा पुष्पाताई लेले संचलित स्वर संवादिनी भजनी मंडळ ठाणे, शिवगायन करणार आहेत. अकरा वाजता शिवप्रतिमा पालखी मिरवणूक सोहळा झाल्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरीही सर्व शिवभक्तांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.