११ वर्षांनंतर पुन्हा अंकुश ,स्वप्नील आणि सई दिसणार एकत्र, ‘दुनियादारी २’ची येणार?

    05-Jun-2024
Total Views |

ankush sai swapnil 
 
 
मुंबई : 'दुनियादारी' हा चित्रपट आजही प्रेक्षकांना लक्षात आहे. त्यातील शिरीन, बच्चू आणि दिग्या आपल्याला आपल्या मित्रांची आठवण नक्कीच करुन देतात. आता पुन्हा एकदा ही तीन पात्र अर्थातअ सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी आणि अंकुश चौधरी तब्बल ११ वर्षांनंतर एकत्र दिसणार आहेत. शिवाय ज्या चित्रपटात ते एकत्र झळकणार आहेत त्याचे दिग्दर्शन संजय जाधव करणार असल्यामुळे दुनियादार २ हा तो चित्रपट आहे का अशा चर्चा देखील सुरु झाल्या आहेत.
 
ए.वी.के पिक्चरस्, व्हिडीओ पॅलेस आणि मैटाडोर प्रोडक्शन प्रस्तुत एक नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव आणि अन्य बाबी जरी गुलदस्त्यात असल्या तरी अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी, संजय जाधव यांची टीम पाहूनच प्रेक्षकांच्या मनात टिक टिक वाजली असेल आणि धडधड पण नक्कीच झाली आहे. या चित्रपटाची पूर्वतयारी आता सुरु झाली असून ही टीम प्रेक्षकांना ११ वर्षांनंतर भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव आहेत. तर या सिनेमाचे निर्माते स्वाती खोपकर, अमेय खोपकर, नानूभाई जयसिंघानी आणि निनाद बत्तीन आहेत.
 

ankush sai swapnil 
 
या चित्रपटाबद्दल निर्माते अमेय खोपकर म्हणतात, " संजय जाधव यांचासारखा धमाकेदार दिग्दर्शक यांच्यासोबत येरे येरे पैसा, येरे येरे पैसा 3, कलावती हे यशस्वी चित्रपट केल्यानंतर आता हा नवाकोरा चित्रपट करायला मिळतो आहे. अंकुश, सई, स्वप्नील यांसारखे कमाल कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या टीमसोबत माझे जुने ऋणानुबंध आहेत आणि ही टीम एकत्र आणण्याचा योग निनाद बत्तीन यांनी जुळवून आणला असून ही टीम पुन्हा एकत्र आल्यावर मोठा गेम तर नक्कीच होणार आणि चित्रपट गाजणारच!"